दिनांक :१९.०६.२०२१ मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कोविड १९ साथीचा प्रादुर्भाव मार्च २०२० पासून चालू आहे. याच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेशी मिरा भाईंदर महानगरपालिकेने अत्यंत समर्थपणे सामना केलेला आहे. कोविड -१९ च्या संकटाचा मुकाबला करणे हे खूप धेर्याचे काम होते. यातील एक मैलाचा दगड असे यश मीरा भाईंदर महानारपालिकेने दि . १७. ०६. २०२१ रोजी प्राप्त केले. या दिवशी मीरा भाईंदर महानगरपालिकेतील मुर्त्यूमुखी पडलेल्या रुग्णाची संख्या शून्य झाली होती . मीरा भाईंदर महानारपालिकेचे मा. आयुक्त श्री. दिलीप ढोले यांच्या दूरदृष्टी मुळे व कणखर नेतृत्वाने हे यश साध्य झाले.
याकरिता मा. महापौर , सौ .जोत्स्ना हस्नाळे , मा. खासदार श्री राजन विचारे , मा. आमदार ,श्री. प्रताप सरनाईक ,मा, आमदार श्रीम .गीता जैन , मा. उपमहापौर श्री. हसमुख गहलोत , सर्व नगरसेवक , मा. आयुक्त (मुख्यालय ) श्री, विजयकुमार म्हसाळ , मा. उपायुक्त (वैद्यकीय ) ,श्री. संभाजी वाघमारे ,मा. उपायुक्त (आरोग्य ). डॉ . संभाजी पानपट्टे , मा. उपायुक्त श्री. अजित मुठे , वैद्यकीय आरोग्य अधिकारी , डॉ . प्रकाश जाधव , तसेच सर्व महापालिका पधादिकारी व अधिकारी यांचे सहकार्य लाभले .
मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग ,डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ ,व इतर वैद्यकीय विभागातील कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे हि मजल मारता आली. कोविड -१९च्या आजराचा कहर एकेकाळी चालू होता व त्याला अचूक वेसण घालण्याचे काम मा. आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाले , हि आपली एक मोठी उपलब्धी आहे. याचप्रकारे अविरत पर्यन्त करून मीरा भाईंदर महानगरपालिकातिसऱ्या लाटेशी दोन हात सज्ज झालेली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त , कर्मचारी व जनता यांच्या सहकार्याने अशाप्रकारे पुढेही कोविड -१९ च्या संकटाचा समर्थपणे मुकाबला करेल .
