दि 14/02/2021रोजी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचा समांतर मा पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई याचे आदेशाने तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील चोरीस गेले मालातील मोबाईल फोन चे IMEI नंबर द्वारे प्राप्त CDR चे आधारे सदरचा मोबाईल फोन महिला नाव साक्षी विशाल गमरे वय 21 वर्ष राठी- उल्हासनगर 3 वापरत असल्याचे समजले त्याप्रमाणे त्यांचा कौशल्याने शोध घेऊन त्याच्याकडे केलेल्या तपासात त्यांने गुन्ह्यातील मोबाईल फोन स्वतः वापरत असल्याचे कबूल केले त्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील 5000/- आयटेल कंपनीचा निळा रंगाचा मोबाईल फोन जप्त करून त्यांचे मदतीने गुन्ह्यातील मोबाईल फोन चोरी करणारा इसम नाव-राजा रमेश सोनवणे उर्फ शाहरूख राजा राहणार उल्हासनगर यास ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई श्री गजेंद्र पाटील, वपोनी, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री शेख आणि पथकाने केली आहे.
