मिरारोड : रात्रीच्या वेळेस घरफोडी चोरी करणा-या आरोपीस अटक करुन २६,६०,०००/- रुपये किंमतीची रोख रक्कम व सोन्याचे दागीने हस्तगत- गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा यांची कामगिरी. मिळालेल्या माहितीनुसार
दिनांक ०४.११.२०२२ रोजी रात्री ०९:०० ते ११-१५ वाजताच्या दरम्यान, बी/६०४ बी/विंग, विंगस्टोन बिल्डींग, १५ नंबर बस स्टॉप, मिरारोड पुर्व ता.जि.ठाणे येथे राहणाऱ्या श्रीमती तरन्नुम जावेद खान वय ३० वर्ष, यांच्या घरातुन घराचे लॅच तोडुन घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले १) २५,००,०००/-रु. रोख २) १,२०,०००/- रु. किमतीचे ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ३) ४०,०००/-रु. किमतीचे १० ग्रॅम वजनाचे कानातील झुमके असा एकुण – २६,६०,०००/-रु. किमतीची रोख रक्कम व सोन्याचे दागीने अज्ञात चोरटयाने चोरुन नेले याबाबत श्रीमती तरन्नुम जावेद खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून मिरारोड पोलीस ठाण्यात दिनांक ०५/११/२०२२ रोजी गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा गुन्हे शाखा, कक्ष-१ काशिमीरा यांनी चोरी झाली त्या घटनास्थळाची पाहणी करुन घटनास्थळावरुन मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे व ज्यांच्या घरी चोरी झाली त्याच्याकडून मिळून आलेल्या माहितीप्रमाणे सदरचा गुन्हा हा श्रीमती तरन्नुम जावेद खान यांचा भाऊ फरमान जावेद खान, व्यवसाय रिक्षा ड्रायव्हर, सध्या रा. प्लॉट नं. २०, मालवणी गेट नं.५, मदर टेरेसा स्कुल जवळ, मालवणी मालाड, प. याने केला असल्याचा संशय आल्याने सदर संशयित याचा शोध पोलीस घेत असताना आरोपी हा त्याची पत्नी व मुलगा व मेहुणी सोबत कोठेतरी निघुन गेला असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने संशयित याचा सदर ठिकाणी मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार गुन्हे शाखा कक्ष-१ चे अधिकारी व अंमलदार यांच्या तीन वेगवेगळया टिम तयार करुन तपास पथके शोध घेण्याकामी पाठविण्यात आले. सदर पथकाकडून वेगवेगळया रेल्वे स्टेशन वरुन मिळविण्यात आलेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करुन आरोपी हा गुजरात राज्यात पळुन जात असल्याचे पोलिसांना समजले,त्याप्रमाणे तपास पथकाने आरोपी याचा वापी, सुरत, वलसाड परिसरात शोध घेत असतांना आरोपी हा वलसाड, राज्य गुजरात येथे मिळुन आल्याने त्यास दिनांक ०६/११/२०२२ रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकून कडुन सदर गुन्हयांतील घरफोडी चोरी करुन नेलेल्या मालमत्तेतील २५,२४,५००/-रुपये रोख रक्कम व गुन्हयांत वापरलेले ०६ मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात काशिमीरा पोलिसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा कक्ष १ काशिमीरा नेमणुकीतील पो.नि. अविराज कुराडे,स.पो.नि.पुष्पराज सुर्वे, पोउपनिरी. हितेंद्र विचारे, सफौ. राजु तांबे, संदीप शिंदे, किशोर वाडीले, पो.हवा.संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, प्रफुल्ल पाटील, विकास राजपूत, सचिन सावंत, समीर यादव, प्रशांत विसपुते, पो.शि. सनी सुर्यवंशी यांनी केलेली आहे.
