पालघर : दिनांक २८/६/२०२१ रोजी सकाळी १) गौरी शिवदयाल पटनाईक वय : ६१ या माहीम रोडवरील विजया बँकेच्या समोरून बाजूने पायी जात असताना २ अनोळखी इसम मोटार सायकल वरून येऊन सौ. गौरी पटनाईक यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरीने चोरून पळून गेले . तसेच २)श्रीमती वंदना बाळाजी तेरे याही विजया बँकेच्या समोरून बाजूने पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरी करून नेले होते.३) दि. ८/१/२०२१ रोजी सायंकाळी ६. १० ते ६. २० दरम्यान सौ . स्वाती राजाराम जमदाडे वय ३१ रा. पालघर या रामनगर पोलीस कॉलनी चे जवळून जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्याचा गळ्यातील दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याबाबत वरील फिर्यादी यांनी पालघर पोलीस ठाणे येथे दोन अनोळखी आरोपी विरुद्ध दि. २८/०६/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. श्री. दत्तात्रय शिंदे , पोलीस अधीक्षक पालघर, मा. प्रकाश गायकवाड , अपर पोलीस अधीक्षक पालघर , व मा. श्री. विकास नाईक , उप विभागीय पोलीस अधिकारी , पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक ढाकरे , पोलीस उप निरीक्षक अल्पेश विशे , वाणगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे आशिष पाटील यांची तपास पथके तयार केली , व वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करून आरोपीची माहिती गोळा केली . सदर गुन्ह्यातील कोणतेही धागेदोरे नसताना पो.उ.नि आशिष पाटील व पोउनि अल्पेश विशे यांचे पथकाने आरोपी क्र . वय : ४५, रा. आंबीवली यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार कर. २ वय : ३६ रा. आंबीवली याचे सह केल्याचे कबूल केले. अटक आरोपी कडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीक क्र २ हा सध्या गुजरात येथील गुन्ह्यात अटक केलेला असून त्याचा ताबा घेणयाबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यास देखील अटक करून अधिक तपास करीत आहेत. नमुद गुन्हयातील आरोपी विरुद्ध चोरीचे ८ गुन्हे, सरकारी नोकरावर हल्ले २ गुन्हे , फसवणुक करणे १ असे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत .
सदरची कामगिरी मा. श्री. दत्तात्रय शिंदे , पोलीस अधीक्षक पालघर, मा. प्रकाश गायकवाड , अपर पोलीस अधीक्षक पालघर , व श्री. रवींद्र नाईक, प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि अल्पेश विशे, पो.उ.नि आशिष पाटील व बोईसर युनिटचे पोलीस अधिकारी पोहवा दीपक राऊत, पोहवा . हिरामण खोटारे , पोहवा . निरज शुल्का , पोहवा . संदीप सूर्यवंशी, पोना. नरेंद्र पाटील, पोना. कैलास पाटील. पोना. कपिल नेमाडे, पोना . राकेश पाटील , पोना. विजय ठाकूर तसेच पोना. पालवे व पोना. वसावे नेमणूक पालघर पो. स्टे व पोशि. प्रशांत निकम, पोशि . अहिरे , बोईसर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.
