मुबंई : सूत्रांच्या माहितीनुसार मेघवाडी विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील यांच्यावर लाच घेतले प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) त्यांच्यावर कारवाई केली आहे अशी माहिती राज्य पोलिस दलालातून समोर आली आहे. पोलिस अधिकारी सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी व जोगेश्वरी पोलीस ठाण्याचा ताबा आहे . सुजाता पाटील या सध्या प्रसिध्दी झोतात होत्या त्यातच काही दिवसापूर्वी त्यांनी काही प्रकरणासाठी १ लाख रुपयाची मागणी केल्याचे समोर आले . मिळालेल्या माहितीनुसार याधरतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सुजाता पाटील यांना रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau) कारवाईमुळे राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास चालू असून एसीबी च्या अधिकाऱ्याकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही .
