वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी- घरफोडी, जबरी चोरी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरटयांना अटक करून १७ गुन्हे उघडकीस.

Crime News

दिनांक : ०४/०८/२०२१  रोजी वालीव पोलीस ठाण्याचा हद्दीत जबरदस्ती ने चोरी,घरफोडी, वाहन चोरीचे प्रमाण वाढत असल्याने कारणाने सदर गुन्हेगारांचा शोध वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वालिव गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील बारकावे, व गुप्त बातमीदारांचे आधारे गुन्हयांचा तपास करून आरोपी १) आकाश मनोहर पवार रा. जुचंद्र नायगांव पूर्व २) नितीन सीताराम थोरात , रा. वसई पूर्व ३) गौरव महेश सिंग, रा. वसई पूर्व ४) मोहम्मद तारीख तलाद शेख रा. नालासोपारा पूर्व यांना दिनांक ०४/०८/२०२१  रोजी अटक करून वालीव गुन्हे शाखेतील अधिकरी व अंमलदार यांनी आरोपीना विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी सोन्याचे चांदीचे दागिने , मोबाईल, रोख रक्कम व मोटार सायकली असा एकुण २,५३,४००/- किंमतीचा माल हस्तगत करून एकुण १७ गुन्हे उघडकीस आले.

सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त , परिमंडळ-२, वसई , श्री. अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त , तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे,पोनी. श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. ज्ञानेश फडतरे , पो.हवा. मनोज मोरे, मुकेश पवार, योगेश देशमुख, पो.ना. सचिन दोरकर, किरण म्हात्रे, राजेंद्र फड , पो अंम. विनेश कोकणी, सचिन बळीद, गजानन गरीबे यांनी केलेली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 1 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply