मिरारोड (दि.११) – खुनासारख्या गंभीर गुन्हयात गेले ११ महिन्यापासुन फरार असलेल्या आरोपीस अटक -मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी. अधिक माहीतीनुसार मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणा-या श्रीमती रुपादेवी राजेशकुमार राज वय.४० वर्षे रा.रुम नं.१०३ / सी विंग, क्विन्स पार्क, शिवारगार्डन, मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे यांनी दिनांक ३०/०१/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली कि, त्यांचा मुलगा अंकुश राज यास अनोळखी इसमांनी गैरकायदयाची मंडळी जमुन मनाई आदेशाचे उल्लंघन करुन त्यास लाथाबुक्यांनी मारहाण करुन धारदार टोकेरी चॉपर व तलवारी या हत्यारांनी त्याच्या छाती – पाठीवर भोसकुन गंभीर दुखापत करुन त्यास जिवे ठार मारले. या बाबत त्यांनी दिलेल्या तक्रारी वरुन मिरारोड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासात पोलिसांनी एकुण ११ आरोपींना अटक केली होती. या गुन्हयात एकुण ३ फरार आरोपी असुन त्यांचा शोध गेले ११ महिन्यापासुन मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्याकडुन चालु होता.
वर नमुद फरार आरोपी यांचा शोध घेत असतांना दिनांक ०९/१२/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, वर नमुद ३ आरोपींपैकी पाहिजे आरोपी रोहितकुमार शंकर पासवान वय २४ वर्षे ५ महिने रा. रुम नं. ५०८, म्हाडा बिल्डींग, दत्त मंदीराजवळ, जनता नगर, माशाचा पाडा, काशिमिरा, मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे मुळ रा. रौणा, ता.बेलागंज, जिल्हा गया, राज्य बिहार हा त्याच्या नातेवाईकांना भेटण्याकरीता काशिमिरा हद्दीतील चैना ब्रिज येथे येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चैना ब्रिजचे आसपास पोलीस दबाधरुन बसले असता आरोपी रोहितकुमार शंकर पासवान हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाच्या कामी गुन्हयाचे तपास अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्री.जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, मिरारोड, श्री. महेश तरडे सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पाटील (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि/संतोष सांगवीकर, सपोनि / रामकृष्ण बोडके, पोउपनि / किरण वंजारी, स.फौ.प्रशांत महाले, पोहवा / प्रफुल्ल महाकुलकर, प्रदीप गाडेकर, बालाजी हरणे, परेश पाटील, तानाजी कौटे, पो.अमं. शंकर शेळके, अथर्व देवरे यांनी केलेली आहे.
