पालघर : दि.०८/०६/२०२२ रोजी ९. ०० च्या सुमारास पालघर बोईसर रोडवर कोळगाव पेट्रोलपंपा पासुन ४०० मिटर अंतरावर फिर्यादी हे बोईसर येथुन त्यांच्या स्कुटीने पालघर येथे येत असतांना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या दोन मोटर सायकल वरुन येवुन फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी पाईपाने फटका मारुन त्यांना खाली पाडुन त्यांच्या डोळयात मिरची पुड टाकुन त्यांना मारहाण करुन दुखापत केली व स्कुटीची चावी घेवुन स्कुटीची डीकी खोलुन त्यामधील सोन्याचे व चांदीचे दागीने तसेच १५०००/- रुपये रोख रक्कम असा एकुण ३,१०,०००/- रुपये किंमतीचा माल दरोडा टाकुन घेवुन गेले म्हणुन पालघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री.बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या आदेशानुसार श्री. प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती निता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर याच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली सदर पथकापैकी पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, बोईसर युनिट यांनी कोणताही धागादोरा नसताना देखील राज्यातुन व परराज्यातुन १) वय ४० वर्षे, रा. पारस ता. दौंड जि. पुणे. २) वय ३२ वर्षे, रा. ६३ चाकन शिक्रापुर रोड, बहुळ ता. खेड जि. पुणे. ३) वय ३४ वर्षे, रा. भागणे, ता. मावळ जि. पुणे. ४)वय २७ वर्षे, रा. गराडू ता. झालोट जि. दाहोद राज्य-गुजरात.५)वय २५ वर्षे, रा. थालीयादेव फलीयु, गराडू ता. झालोट जि. दाहोद राज्य-गुजरात ६)वय २२ वर्षे, रा.कुसेगांव, ता.दौंड, जि.पुणे. ७)वय १९ वर्षे, रा. मोघावडे, ता. पौंड, जि.पुणे. एकुण ०७ संशयीतांना ताब्यात घेवून सदर इसमांकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी वरील प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली असून आरोपींकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक श्री. संतोष जाधव, पालघर पोलीस ठाणे हे करित आहेत.
सदरची कारवाई ही श्री.बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री.प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती निता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर, श्री.अजय वसावे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री.उमेश पाटील, पोलीस निरीक्षक पालघर पोलीस ठाणे, पो.उप.निरी.आशिष पाटील, स्थागुशा बोईसर युनिट तसेच स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे सहा.फौज./राजेश वाघ, पोलीस हवालदार/ दिपक राऊत, पोहवा/ निरज शुक्ला, पोलीस हवा./ संदिप सरदार, पोलीस हवा./ कैलास पाटील, पोना/विजय ठाकूर, पोना/ नरेंद्र पाटील, पोना/संजय धांगडा, पोना/ दिनेश गायकवाड, पोना/राकेश पाटील, पोशि/ वैभव जामदार, पोशि/प्रशांत निकम अंमलदार यांनी केली आहे.
