सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २९/०३/२०२१ रोजी गुन्हे शाखा कक्ष -२ शाहुराज रणवरे यांना विश्वसनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एक इसम वसई पुर्व चिंचोटी ब्रिजच्या जवळ गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने चिंचोटी ब्रीजजवळील पेट्रोल पंपाजवळ पोलीस स्टाफसह सापळा रचून २३.३० वाजताचे सुमारास इसम नामे अशोक गणेश गायकवाड रा. कोथाडी पाडा, चिंचोटी, ता.वसई जि.पालघर हा त्याचे ताब्यात १,००,०००/- रु किंमतीचा ५ किलो २०० ग्रॅम गांजा नावाचा अंमलीपादार्थ जवळ विक्रीकरीता बाळगला असताना मिळुन आला आहे.
सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध पोलीस हवालदार. रमेश अधिकराव भोसले नेम गुन्हे शाखा – २ वसई युनीट मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांनी
सरकार तर्फे फिर्याद दिली असुन त्याबाबत वालीव पो.स्टे. गु.र.क्र. ३३७/२०२१ एनडीपीएस. अॅक्ट कलम ८(क), २२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री. महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे) व श्री. राजेंद्र देशमुख सहा पो.आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, श्री शाहुराज रणवरे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा -२, सपोनि/सुहास कांबळे, सफौ./महादेव वेदपाठक, पो.हवा./मंगेश चव्हाण,आणि पथक यांनी केली आहे.
