दादर : तरुण पिढी अंमली पदार्थ सेवनाच्या खूपच अधिन झालेली आहे अंमली पदार्थाची वाढती मागणी पुरविण्यासाठी आरोपी वेगवेगळ्या युक्त्या लावतांना दिसत आहे याला आळा बसावा म्हणून मुंबई पोलीसांनी अंमली पदार्थ वाहतुक व विक्री विरोधात धडक कारवाई सुरु केल्याने या तस्कारांनी रेल्वेने वाहतुक सुरु केल्याचे समोर आले आहे. दिनांक २६/०८/२०२१ रोजी पहाटे ०३.४० वा. दादर रेल्वे स्थानकात आलेल्या कोनार्क एक्सप्रेस गाडीतुन उतरणाऱ्या प्रवाशांच्या बॅगेची चेकिंग करीत असता आरपीएम व जीआरपी पोलीसांच्या निदर्शनास एक तृतीयपंथी व्यक्ती तिच्या जवळील बॅगा चेक करण्यात विरोध करत असतांना मिळुन आली. तिच्या जवळील बॅगांची तपासणी करता त्यामध्ये १५ किलो वजनाचा १५००००/- रु. किंमतीचा गांजा मिळुन आल्याने तिच्या विरुध्द दादर रेल्वे पोलीस ठाणे दाखल करण्यात आलेला आहे. तृतीयपंथीस मे. कोर्टात हजर केले असता तिला ०३/०९/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेले आहे.सदरचा तृतीयपंथी हा बैंगलोरचा रहीवाशी असून, सदरचे रॅकेट हे बैंगलोर ते दादर असे कार्यरत असल्याचे दिसुन येत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई श्री कैसर खालीद, पोलीस उप आयुक्त श्री. मकानदार सो, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पोवार व पथक गुन्हयांचा तपास करीत असुन, खोलवर रुतलेल्या या गुन्हयाचे तळापर्यत जावुन त्याचा समुळ नाश करण्याचा प्रयत्न करीत आहे. या गुन्हयाची सुरुवात ही बैंगलोर पासुन सुरु होत असुन मुंबई शहरात संपत असल्याने दोन्ही ठिकाणी तपास करुन या आंतरराज्यीय टोळीचा बिमोड करण्याचे आव्हान पोलीसां समोर उभे आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास चालु आहे.
