मुंबई : दिनांक ३१/०१/२०२२ रोजी मानखुर्द पोलीस ठाणे,येथे गुप्त बातमीदारांकडून अशी खबर प्राप्त झाली होती की, मारूती मोबाईल ऍण्ड कॉस्मेटीक, मानखुर्द स्टेशनजवळ, सायन पनवेल रोड, मानखुर्द (प), या ठिकाणी एक इसम हा बनावट आर.टी.पी.सी.आर.अहवाल बनवुन देत आहे.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याकरीता एक डमी गिन्हाईक तयार करून त्याच्या मार्फत चार व्यक्तींचे आर.टी.पी.सी.आर. रिपोर्ट बनविण्याकरीता त्यांच्या आधार कार्डच्या छायांकित प्रती सदर इसमांकडे देण्यात आल्या होत्या. आरोपीने वरील चार आधारकार्ड पैकी दोन इसमांचे आर.टी.पी.सी.आर अहवाल पॉझीटीव्ह व दोन इसमांचे आर. टी.पी.सी.आर अहवाल निगेटीव्ह बनवुन तयार असल्याचे गि-हाईकास कळविले होते. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-०४ यांनी पोलिसांचे पथक तयार करून नमुद डमी गि-हाईक व पंचांसह मारूती मोबाईल ऍण्ड कॉस्मेटीक, या ठिकाणी छापा टाकला असता, नमुद इसमाने कोणतीही चाचणी न करता वरील प्रमाणे आर.टी. पी.सी.आर चे अहवाल डमी गिऱ्हाईकास दिले असता पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले व त्याच्या दुकानाची झडती घेतली असता, दुकानामध्ये इतर कोवीड-१९ लसीकरणाची २१ बनावट प्रमाणपत्रे देखील मिळुन आली. सदर इसमाकडे अधिक चौकशी केली असता, तो सदरचे बनावट आर.टी. पी.सी.आर.अहवाल हे नायट्रो प्रो-९ हया पिडीएफ एडीटर ऍप मधुन स्पाइस हेल्थ टेस्टींग लॅबच्या नावाची बनवत असून त्यापैकी आर.टी.पी.आर.अहवाल रू.२००/- व कोवीड-१९ लसीकरणाचे प्रमाणपत्र रू.५०/- मध्ये तयार करून देत असल्याचे त्याने कबूली दिली . त्यावरून सदरबाबत सविस्तर पंचनामा करून इसमास ताब्यात घेण्यात आले असून मानखुर्द पोलीस ठाणे या ठिकाणी घेवून जावून त्याच्या विरूध्द वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला .
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त(गुन्हे) श्री मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री एस विरेश प्रभु, मा.पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), श्री. निलोत्पल, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-मध्य), श्री.नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, पोनि.जगदिश भांबळ, सपोनि. यशवंत शिंदे, सपोनि.गव्हाणे, सपोनि. बिराजदार, पोउनि. आंबवडे, सफौ. आंब्रे, पो.ह.सुर्यवंशी, पोह. तळेकर, पोना.गव्हाणे, पोशि.जगताप, पोशि.गायकवाड, पो.शि.साळुखे यांनी पार पाडलेली आहे.
