मुंबई : लग्नाचे खोटे आमिष दाखवुन एका २८ वर्ष वयाच्या मुलीला फसवल्याची तक्रार मुलीने कांजुरमार्ग पोलीस ठाणे येथे केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक १४/०९/२०२१ आरोपी याने marathimatrimony.com या लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटवरून मुलींशी सपंर्क केला व तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी भावनिक जवळीक साधुन मुलीची दिशाभुल करून पैसे गुंतविण्याच्या बहाण्याने तिच्याकडून आरोपी याने रू.२,२५,000/- इतकी रक्कम त्याच्या अभ्युदय बँकेच्या खात्यात टाकण्यास सांगितले मुलीला त्यांच्यावर विश्वास बसल्यामुळे तिने आरोपी च्या खात्यात पूर्ण रक्कम जमा केली. पैसे मिळाल्यानंतर आरोपी याने अप्रामाणिकपणे, कपटीपणाने तसेच लग्न न करता स्विकारलेले पैसे परत केले नाहीत व तो फरार झाला . झालेल्या प्रकारात मुलीची दिशाभूल करून तिला मानसिक तसेच आर्थिक नुकसान करून फसवणुक केली म्हणुन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कांजुरमार्ग पोलीस ठाणे येथे दि. १२/११/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष-७, मुंबई यांच्या कडुन करण्यात येत होता. तपास करते वेळी आरोपीने त्याच्या बँक खात्याशी संबंधीत असलेला पत्ता हा खोटा दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपीचा शोध घेताना पोलिसांनी आरोपीचे marathimatrimony.com, Jeevansathi.com, Facebook , Instagram, What’s app या सोशल साईट वरून माहीती घेण्याचा प्रयत्न केला असता सदरचे सोशल अकाउंटवर देखील त्याने दुस-या व्यक्तींचा फोटो ठेवुन, तसेच खोटा पत्ता नोंद करून बनावट रित्या तयार केले असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे त्याने आत्तापर्यंत फसवणुक करण्याकरीता वापरलेल्या मोबाईल क्रमांक चे सी.डी.आर.व एस.डी.आर. यांची पडताळणी केली असता एस.डी.आर.मध्ये नोंद पत्ता देखील खोटा असल्याचे तपासादरम्यान समोर आले तसेच गोपनिय बातमीदारामार्फत नमुद आरोपीने अशा प्रकारे ब-याच मुलींना भावनिक दृष्टया गुंतवुन फसवणुक केल्याची माहीती प्राप्त झाली होती.त्यामुळे आरोपीचा एक महीना शोध घेवुन देखील तो पोलिसांना मिळुन येत नव्हता.
त्यानंतर पोलिसांनी फरार आरोपी याने वापरलेले वेगवेगळे मोबाईल्स, सोशल साईट्स व ऍप्स यांचे बारकाईने विश्लेषण करून आणि मानवी कौशल्य व गोपनिय माहीती प्राप्त करून दोन पथके तयार केली व कल्याण, ठाणे परीसरात आरोपीचा सतत शोध घेतला असता, दि.१७/०१/२०२२ रोजी श्रध्दा महल, कल्याण पुर्व या ठिकाणी एका फ्लॅट मध्ये बाहेरून लॉक लावुन आतमध्ये स्वत:चे अस्तीत्व लपवुन आरोपी राहत असल्याबाबतची खात्रीशीर माहीती पोलीस पथकास प्राप्त झाली. त्याआधारे पथकातील एका अधिकाऱ्याने हॉटेलचा डिलीवरी बॉय आहे असल्याचे भासवुन नमुद फ्लॅटमध्ये जावुन आरोपीस शिताफीने व कौशल्याने ताब्यात घेतले त्याची गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्याचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाला आहे. आरोपी: विशाल सुरेश चव्हाण उर्फ अनुराग चव्हाण, वय ३४ वर्षे, हा उच्चशिक्षीत असून त्याच्या विरूद्ध यापुर्वी ४गुन्हे दाखल आहेत
सदर आरोपी याने यापुर्वी ३५ ते ४० पेक्षा जास्त मुलींना marathimatrimony.com, Jeevansathi.com, Facebook , Instagram, What’s app या सोशल साईटवरून खोटया व बनावट प्रोफाईलच्या आधारे संपर्क साधुन स्वत: खुप मोठा व श्रीमंत असल्याचे भासवुन मुलींना लग्नाचे आमिष दाखवुन त्यांना भावनिक रित्या गुंतवितो त्यांनतर मुलींशी जवळीक साधुन भविष्याकरीता शेअरमार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करण्याकरीता १५ ते २० लाख रूपये घेवुन त्यांची फसवणुक केली तसेच विविध सोशल साईटच्या मार्फतीने नमुद आरोपी हा वेगवेगळया पुरूष इसमांशी संपर्क करून तो आयफोन मोबाईल मध्ये मोठया पदावर असल्याचे खोटे व बनावट प्रोफाईलच्या आधारे कमी किंमतीमध्ये लेटेस्ट आयफोन देण्याचे आमिष दाखवुन सुमारे २५ ते ३० इसमांकडुन २० ते २५ लाख रक्कम घेवुन आयफोन न देता फसवणुक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त(गुन्हे) श्री. मिलींद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) श्री. विरेश प्रभु, मा. पोलीस उप आयुक्त(प्रकटीकरण-१) श्री. संग्रामसिंह निशाणदार, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त(डि-पूर्व) श्री. नितीन अलकनुरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. प्रिया थोरात, पो.नि. सुधीर जाधव, सहा. पो.नि. अमोगसिद्ध ओलेकर, पो. उप.नि. रामदास कदम, स्वप्निल काळे, म.पो.उप.नि. धुमाळ, पो.ह.सुभाष मोरे, पो.ना.विनोद पांडे, पो.ना.प्रमोद जाधव, पो.शि.विकास होनमाने, पो.ना.चा.राजाराम कदम, पो.शि.चा. दिलीपराव राठोड यांनी पार पाडली आहे.
