विरार : एटीएम सेन्टर मधुन पैसे काढने हे काही जणांना कधी कधी जमत नाही त्याकारणाने त्यांना कुणाच्या तरी मदतीची गरज भासते याच गोष्टीचा फायदा घेऊन मिरा-भाईदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिण्यांपासुन एटीएम सेन्टर मधुन पैसे काढून देण्याच्या बहाण्याने काही शातीर गुन्हेगार हातचालाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करुन लोकांचे पैसे लुबाडत होती. याच अनुषंगाने सदर घटनांची मिरा-भाईदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय मा. वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवून याचा तातडीने शोध लावून गुन्हेगारांना वेळीच वेठीस आणण्याबाबत गुन्हे शाखा कक्ष-३ विरार यांना सूचना देण्यात आल्या होत्या. सदर गुन्हयाचे गुन्हे शाखा कक्ष-३ विरार च्या पोलीस पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणात मिळालेल्या माहितीवरुन आरोपी १) परवेझ अकबरअली शेख वय- ३१ वर्षे, रा- म्हारळ गांव, ता. कल्याण, जि. ठाणे २) शंकर रंगानाथ सुरडकर वय- ३७ वर्षे, रा- संत ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी, उल्हासनगर-२, जि. ठाणे यांना दिनांक १९/०९/२०२१ रोजी अटक केली. आरोपीं याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने सदरचे गुन्हे केले असल्याचे पोलीस चौकशीत कबूल केले . सदरचे गुन्हे करण्यासाठी आरोपी यांनी वापरलेली इर्टिगा गाडी क्रमांक एम.एच. ४६. एयु. ३९०४ व मोबाईल फोन असा एकुण ५,२०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी वरष्ठिांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रमोद बडाख, पोउपनिरी. शिवाजी खाडे, उमेश भागवत, सफौ. अनिल वेळे, पो.हवा. अशोक पाटील, पो.ना. मुकेश तटकरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, शंकर शिंदे, सचिन घेरे, पोशि.राकेश पवार, अश्विन पाटील सर्व नेम- गुन्हे शाखा, यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
