नालासोपारा : बेकायदेशीर गर्दी व मारामारी करुन अग्निशस्त्राने दहशत माजविणाऱ्या आरोपीस अग्निशस्त्रासह ताब्यात घेण्यास गुन्हे शाखा कक्ष 3, विरार यांना यश. अधिकमाहितीनुसार मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारे आरोपींबाबत वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेण्यास तसेच त्यांचा शोध घेवुन गुन्हयांना पायबंद घालण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
दि.२०/०५/२०२३ रोजी दुपारी ०३. ०० च्या सुमारास मौजे धानिवबाग येथे सर्व्हे नं.११ हिस्सा नं.१/१ मध्ये नालासोपारा पुर्व ता. वसई जि. पालघर येथे आरोपी १) उस्मान शेख २) तारीख शेख ३)अमन शेख ४) फरमान शेख ५) उमर शेख व अनोळखी ४-५ लोकांनी फिर्यादी व साक्षीदार यांना हाताने, लाथाबुक्यानी, लाकडी दांडक्याने मारहाण करुन यापैकी अमन शेख याने त्याच्या जवळील पिस्टल फिर्यादीस दाखवुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती म्हणुन पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष ३, विरारचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाव्दारे प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी अमानउल्ला मोहम्मद तलत शेख ऊर्फ टायगर रा. गरिब नवाज मशिद जवळ, वाकनपाडा, नालासोपारा यास दिनांक ०२/०६/२०२३ रोजी ५०,५००/- रुपये किंमतीचे एक पिस्तुल व एक जिवंत काडतुससह ताब्यात घेतले असुन त्यास पुढील कारवाई करीता पेल्हार पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ३, विरारचे पो.नि. श्री. प्रमोद बडाख, पो.उप.नि. शिवाजी खाडे, उमेश भागवत, पो. हवा. अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, सागर बारावकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, पो. अंम. राकेश पवार, सुमित जाधव, म.सु. ब. प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव यांनी केली आहे.
