भाईंदर : फिर्यादी यांनी दिनांक २८. ८.२०१५ रोजी दुपारी १. ३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरातून त्यांची अल्पवयीन मुलगी वय १७ वर्ष , हिस कोणीतरी अज्ञात इसमाने ,अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेले असल्याबाबतच्या दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हा दाखल झाल्यापासून यातील अल्पवयीन मुलीचा अजूनपर्यंत शोध लागलेला नव्हता मात्र सदर गुन्ह्यातील अपहरण केलेल्या मुलीचे आई वडील आणि इतर नातेवाईक यांच्या सतत संपर्कात राहून तसेच गुन्हा घडलेल्या परिसरात व इतर संभाव्य ठिकाणी भेटी देवून अपहरण झालेली मुलगी व संशयीत आरोपी बाबत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाने माहिती घेतली . तसेच तांत्रिक बाबींचा कौशल्याने वापर करून आरोपी नाव: अनिल कुमार राय यास घर नं ., गल्ली नं . २४, संजय कॉलनी , सेक्टर नं ., फरिदाबाद , हरियाणा येथून स्थानिक पोलिसांचे मदतीने अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेऊन यातील अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली .
सदर ची कामगिरी डॉ . श्री. महेश पाटील ,पोलीस उप. आयुक्त (गुन्हे ) ,श्री. रामचंद्र देशमुख , सहा . पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि . श्री संपतराव पाटील, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष , भाईंदर, पो. हवा . उमेश पाटील , पो.हवा. रामचंद्र शिवाजी पाटील, पोना. सम्राट गावडे , मपोना कमल चव्हाण नेम . अ. मा. वा . प्रति . कक्ष , भाईंदर यांनी केली आहे.
