राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अधिकारी बनून खंडणी वसुली करणा-या आरोपींना केले जेरबंद .

Crime News

भाईंदर : नॅशनल ह्युमन राईटचे शासकीय अधिकारी आहेत हे सांगून रेशनिंगचे दुकान चालवणाऱ्या कडून खंडणीची मागणी करणाऱ्यांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले. सूत्रांच्या माहितीनुसार   रमेश सुर्यप्रसाद वर्मा, वय ३२ वर्षे यांचे किराणा व रेशनिंगचे दुकान असून त्यावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दिनांक ०५.११.२०२१ रोजी  वर्मा यांच्या दुकानावर  एक अनोळखी महिला व पुरुष यांनी येऊन त्यांना  ते नॅशनल ह्युमन राईटचे शासकीय अधिकारीशबानाबानो बल्लुभाई सिध्दीकी व   प्रशांत गंगा विष्णूआहोत असे बोलुन  त्यांच्याकडून तुम्ही रेशनचे वाटप कसे करता व तुमचे कम्प्लेंट बुक दाखवा अशी मागणी केली असता दुकानदार याने ती वही नेहमी  रेशनिंग अधिकारी तपासणी करीत असल्याने  तुम्हांस मी ओळखत नाही असे सांगून सदर वही देण्यास दुकानदार याने नकार दिला त्यावरून  आम्ही सुध्दा शासकीय अधिकारी आहोत, कम्प्लेट बुक दाखविली नाही तर तुमच्याविरुध्द केस करु तसेच आम्ही इतर रेशनिंग दुकानावरील कंप्लेंट  बुक तपासणी केली आहे त्यांनी आम्हाला फी दिल्याने आम्ही त्यांच्यावर केस केलेली नाही असे संगितले त्यानंतर सदरील अनोळखी इसमांनी दुकानदार यांना आपण  कोणतीही केस करणार नाहीत त्याबदल्यात त्यांची फी म्हणुन ५०,०००/- रु. ची मागणी केली. त्यावेळी दुकानदार   घाबरल्याने व त्यांच्या गल्ल्यात असलेले २०,०००/- रु. ती रक्कम सदरच्या अनोळखी इसमांना दिली. व उर्वरीत ३०,०००/- रु. रक्कम एका आठवड्याचे आत दे  नाहीतर केस करु असे बोलुन ते निघुन गेले. झालेल्या प्रकाराबाबत दुकानदार यांनीपोलीस नवघर ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. दि. १९.११.२०२१ रोजी नवघर पोलीस ठाणे गुन्हा  नोंद करण्यात आला होता.

सदर  गुन्हयाचा  तपास करीत असतांना आरोपी १)  शबानाबानो बल्लुभाई सिध्दीकी, वय ३० वर्ष, सांताक्रुज पश्चिम,  २) प्रशांत गंगा विष्णु, वय २७ वर्ष, रा. मिरा रोड, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे . नमुद आरोपीकडुन ह्यूमन  राईटचे नावाने असलेले ओळखपत्र प्राप्त केले असुन त्यावर National Human Rights & Social Justice Commission (GOVT.OF NCT DELHI) असे नमुद केले आहे. तसेच National Human Rights & Social Justice Commission A National Level Civic & Autonomous Body Head Quarter New Delhi, The Social Justice for Every Human अशा हेडचे लेटर हेड आणि मिरा-भाईंदर पसिरातील शिधावाटप कार्यायल क्र. ४१ फ उप-भाईंदर विभागातील अधिकृत शिधावाटप दुकानांच्या नावांची यादी पोलिसांना तपासा दरम्यान मिळुन आलेली आहे. आरोपी यांनी  मिरारोड व भाईंदर पोलीस ठाणे हद्दितील रेशनिंग दुकानदार यांना धमकाविल्याचे नवघर पोलिसांना प्राथमीक तपासात आढळून आले आहे.

सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. शशीकांत भोसले, सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/प्रकाश मासाळ(गुन्हे) पोउनि/भगवान पाटील यांनी केलेली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply