जोगेश्वरी : मेघवाडी पोलिसांनी मालकाकडून खंडणी ची मागणी करणाऱ्या नोकरास आपल्या ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओबेरॉय सलेंडर जोगेश्वरी (पर्व) मुंबई येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकास व त्याचा कुटुंबियांना दिनांक २६/४/२०२२ पासून कोणीतरी अज्ञात इसम संपर्क करून त्याच्याकडे रक्कम रुपये १०,००,०००/- ची खंडणीची मागणी करत होता व खंडणी न दिल्यास त्याला व त्याच्या कुटूंबियांना ठार मारण्याची धमकी देत होता तसेच त्यांचा मोबाईल वर संदेश पाठवून त्रास देत होता या सर्व प्रकारामुळे व्यावसायिक यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती .
सदर गुन्ह्यांचा तपास मेघवाडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. सतिश चौगले व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी गुन्ह्यांच्या गुन्हयाचे अनुषंगाने तांत्रिक तपास केला असता, फिर्यादींकडे यापुर्वी चालक म्हणुन काम करणारा संतोष चांगु शामा, वय ५२ वर्षे, रा.ठी. समर्थ नगर, चेंबुर मुंबई- ७१ याने इतर इसमांच्या नावे यापुर्वी घेतलेले दोन सीमकार्ड / भ्रमणध्वनी क्रमांकाचे व व्यावसायिक यांना येणारे खंडणीचे येणारे फोन हे एकच असल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले त्यानंतर आरोपीची अजून चौकशी केली असता त्याने दोन दोन महिन्यापर्वीच मुंबईतील भाडयाने रहात असलेले घर खाली केले असल्याचे समजल्यामुळे त्याची काही एक माहिती नसताना ,त्यास तांत्रिक तपासाचे आधारे सिप्झ गेट क्र. ३, अंधेरी पुर्व, मुंबई येथुन दि.१०/०५/२०२२ रोजी सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची गुन्हया बाबत चौकशी केली असता सदरचे कृत्य हे त्यानेच केल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. त्यानंतर त्यास दि.११/०५/२०२२ रोजी मा. न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता मा.न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी रिमांड दिले आहे. अटक आरोपीचा गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक तपास मेघवाडी पोलीस करीत आहे .
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्तसो., डॉ. महेश्वर रेडडी, परि–१०, मुंबई, यांचे मार्गदर्शनानुसार तसेच मा.सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. अविनाश पालवे, मेघवाडी विभाग, मुंबई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजीव पिंपळे मेघवाडी पोलीस ठाणे यांचे सुचनेप्रमाणे मेघवाडी पोलीस ठाणेचे पोनि. भरते व तपास पथकातील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि. सतिश चौगले, स.पो.नि. बाबूलाल शिंदे, पो.ना. /खुले,पो.शि./पाटील, पो.शि. /वरठा, पो.शि./ सोनावणे, पो.शि. /शेख, पो.शि. /डब्बे, म.पो.शि. /थोरात यांनी तांत्रिक तपासात सहकार्य करणारे पो.ना. /पिसाळ, पो.शि. /चौगुले यांचे मदतीने पार पाडली.
