अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईदर यांनी वेश्या व्यवसायिक पुरुष दलालावर कारवाई करून ०४ पिडित मुलींची सुटका केली . दिनांक ०३.०४.२०२१ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. एस.एस.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की,नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय जलाराम काठीयावाडी धाबा, गोल्डन नेस्ट रोड, भाईन्दर पूर्व या ठिकाणी पुरुष वेश्यादलाल पुरुष ग्राहकांना वेश्यागमनासाठी मुली पुरविणार आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. एस.एस.पाटील यांनी पथकासह जय जलाराम काठीयावाडी ढाबा, गोल्डन नेस्ट रोड, भाईन्दर पूर्व या ठिकाणी कारवाई केली.
सदर छापा कारवाईत वेश्या दलाल राजा उर्फ सरवर अख्तर हुसेन वय ४५ वर्ष राहायला भिवंडी, ता.जि.ठाणे. हा वेश्यागमनासाठी ग्राहकांकडुन पैसे
स्वीकारुन त्या मोबद्दल्यात मुली पुरवित असल्याचे निष्पन्न झाले. त्यास वेश्यगमनाकरीता स्विकारलेल्या रक्कमेसह ताब्यात घेवुन ०४ पिडित मुलींची सुटका करण्यात आली.
सदर बाबत अटक आरोपी यांच्या विरुध्द नवघर पोलीस ठाणे येथे पोलीस हवालदार./१९८७ विजय विनायक ढेमरे यांनी सरकार तर्फे फिर्याद देण्यात आली असून नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 1 २६०/२०२१ भा.द.वि.सं. कलम ३७० सह अनैतिक व्यापार कायदा १९५६ चे कलम ४,५ अन्वये गुन्हा दाखल
आहे.
सदरची कारवाई पोलीस उप.आयुक्त डॉ. श्री महेश पाटील (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त, श्री. रामचंद्र देशमुख, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर विभागाचे व.पो.नि.श्री. संपतराव पाटील, पो.हवा./२२६९ उमेश पाटील,आणि पथक यांनी केली आहे.
