भाईंदर: दिनांक ०१/०९/२०२१ रोजी सकाळी ११:०० वाजताचे सुमारास एका रिक्षाचालकाच्या (एम एच ४७ जेडी ६८४५) रिक्षामध्ये एक प्रवासी स्वत:ची बॅग विसरला होता हे रिक्षाचालकाच्या लक्षात येताच त्याने सदरची बॅग काशिमिरा वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सुधाकर रविंद्र सपकाळे हे नवघर नाका येथे कर्तव्यावर असतांना त्यांच्या ताब्यात दिली. सदरची बॅग कुणाची आहे हे पाहण्यासाठी सपकाळे यांनी बॅग उघडली असता त्यामध्ये समोरील व्यक्तीचे ओळखपत्र व दिड लाख रुपये रोख रक्कम असे मिळून आले. बॅगमध्ये मिळालेल्या व्हिजीटिंग कार्डवरील मोबाईल क्रमांकावर पोलीस अंमलदार सपकाळे यांनी संपर्क साधुन समोरील व्यक्तीने आपली समोरील व्यक्ती जय पोपटलाल गाडा असे त्याचे नाव असून त्यांनी सकाळी दहिसर येथून भाईंदरला येण्यासाठी रिक्षा केली होती मात्र दहिसर चेक नाका येथे उतरतांना त्यांच्याकडे असलेली बॅग रिक्षा मध्येच विसरले असल्याबाबत फोनद्वारे सांगीतले. त्यानंतर जय पोपटलाल गाडा यांना भाईंदर येथे बोलावून सदरची बॅग त्यांचीच असल्याची खात्री करुन दिड लाख रोख रक्कम व ओळखपत्रासह असलेली बॅग त्यांच्या ताब्यात देण्यात आली. रिक्षामध्ये रोख रकमेसह हरविलेली बॅग परत मिळाल्याने प्रवाशी जय गाडा यांनी वाहतूक पोलीसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
