अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार-धर्मांतर-निकाह करुन गर्भवती बनवले;श्रीरामपुरातील धक्कादायक घटना…

Crime News Latest News Political News Regional News ताज्या घडामोडी

श्रीरामपूर(प्रतिनिधी) -श्रीरामपूर शहरात वार्ड नं. २ मध्ये राहणारा आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर, वय ३५ वर्ष याने एका १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीला शाळेतून पळवून नेवून तिचे जबरदस्तीने हिंदू धर्मातुन मुस्लीम धर्मात धर्मांतर करून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला व बळजबरीने निकाहही केला. आरोपी हा विवाहित आहे.

या घटनेने परिसरासह शहरात -पालक वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून एसपी मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली या गंभीर गुन्हयातील आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याला श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.या अत्यंत गंभीर घटनेची अधिक माहिती अशी की,शहर परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर, राहणार -वार्ड नंबर ०२,श्रीरामपूर याने ती हिंदू मागासवर्गीय समाजाची आहे हे माहीत असताना देखील तिचे शाळेतून अपहरण केले व जबरदस्तीने उचलून नेऊन धर्मपरिवर्तन करून तिच्यासोबत निकाह केला.तसेच आरोपी इमरान कुरेशी याने वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध केल्यामुळे ही अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती झाली.तरीही आरोपी धमकी देऊन बळजबरीने तिच्यावर बलात्कार करीत आहे.याप्रमाणे पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यामुळे आरोपी इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याच्या विरोधात अपहरण ,बलात्कारासह, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम व ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अतिशय गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास डीवायएसपी श्री.संदीप मिटके हे स्वतः करीत आहेत.पोलीस तपासामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला कोणत्या शाळेतून पळून नेले ?बळजबरीने धर्मांतर कोणत्या ठिकाणी करण्यात आले ? यासह आरोपीने इतर मुलींबाबत असे बलात्कार-धर्मांतराचे प्रकार केले आहे का? आणि त्याचे कोणी साथीदार या गुन्ह्यामध्ये आहे का ? याचा अतिशय काटेकोरपणे शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply