विरार (दि. २९) : मांडवी पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना २४ तासात खुनाचा गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीस केली अटक तपशीलवार माहिती अशी कि मांडवी पोलीस ठाणे यांना दिनांक २५/०५/२०२३ रोजी ११:०० वा. च्या सुमारास ऊसगांव तलावाच्या दिशेने जाणा-या कच्च्या रस्त्यावर सफेद रंगाचा हाफ शर्ट आणि सफेद रंगाची पँट असा पेहराव केलेला, अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाच्या एका पुरुषाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली. मांडवी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. सदर इसमाच्या डोक्यावर आणि चेह-यावर झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांच्या निदर्शनास आले. सदरबाबत करण्यात आलेल्या प्राथमीक चौकशीमध्ये मयताचे नाव भीवा भीक्या वायडा, वय ६० वर्षे, रा. ऊसगाव, पो. भाताणे असल्याचे निष्पन्न झाले. सदरबाबत पो. नि. श्री. शिवानंद शशीकर देवकर (गुन्हे) यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता..
मांडवी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार सदर गंभीर गुन्हयाबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी केलेल्या घटनास्थळाच्या निरीक्षणामध्ये भीवा वायडा याचा मृतदेह असलेल्या ठिकाणी एका सिमेंटच्या दगडावर रक्ताचे डाग असल्याचे दिसले. तसेच घटनास्थळाच्या जवळ असलेल्या Steelmac कंपनीच्या बाहेर असलेल्या सी. सी. टी. व्ही. फुटेजची पहाणी मध्ये दिनांक २४/०५/२०२३ रोजी रात्री ९. ३८ वा. च्या सुमारास एक डोक्यावर विरळ केस आणि फुल हाताचे शर्ट आणि पँट असा पेहराव केलेला इसम घटनास्थळाकडून ऊसगाव नाक्याच्या दिशेने शिरसाड नाका आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या गुजरात वाहीनीवर असलेल्या सर्व्हिस रोडवरून विरार फाट्याच्या दिशेने पायी चालत जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सदरबाबत गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे प्राप्त माहितीच्या अधारे आरोपी विनोद ऊर्फ कांद्या महादू बसवत, रा. ऊसगाव असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी त्याच्या आई सोबत एकटाच राहत असल्याने बऱ्याचदा तो घराबाहेर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसेच तो मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक होते. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजची अधिक अवलोकन करुन अरोपी यास शिरसाड गाव येथुन सापळा करवाई करुन पोलिसांनी ताब्यात घेतले . त्याच्याकडे वर नमुद गुन्हयाबाबत तपास पोलिसांनी केला असता त्याने मयत भीवा वायडा हा भगताचे काम करत असल्याने त्याने विनोद ऊर्फ कांद्याच्या पत्नीला परत आणण्यासाठी जागरण करावे लागेल असे सांगून विनोद ऊर्फ कांद्या याच्याकडून २०००/- रुपये घेतले होते. परंतु जागरण करुन देखील विनोद ऊर्फ कांद्या महादू बसवत याची पत्नी पुन्हा त्याचे घरी न आल्याने दिनांक २४/०५/२०२३ रोजी रात्री ०८:०० वा. च्या सुमारास विनोद ऊर्फ कांद्या आणि मयत भीवा वायडा यांच्यामध्ये वाद झाला असल्याने त्याचा राग मनात धरुन वर नमुद अरोपी याने मयत यास एकत्र दारु प्यायलयानंतर त्याचे डोके सिमेंटच्या दगडावर आपटून त्यांचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. स.पो.नि. संदिप सावंत हे करत असून यातील आरोपी याला दिनांक २६/०५/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. प्रफुल्ल पो.नि. श्री. शिवानंद देवकर (गुन्हे), स.पो.नि. बाबासाहेब पाटील, संदिप सावंत, पो.उप.नि. अभिजीत टेलर, स.फौ. संदिप मोकल, पो. हवा. किरण मोरे, पो. अंम. संजय मासाळ, अमोल साळुंखे, विशाल भगत यांनी केली आहे.
