भाईंदर : सी.आय.डी ऑफीसर असल्याची बतावणी करुन फसवणुक करणा-या आरोपीलामुद्देमालासह अटक – नवघर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. अधिक माहितीनुसार श्री. मोहन सुरु शेट्टी, वय ५६ वर्षे हे दिनांक २२/०६/२०२२ रोजी त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी भाईंदर रेल्वे स्टेशन येथे रेल्वेचे रिझर्वेशन करुन परत घरी जात असताना एक अनोळखी इसम वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, अंगाने मजबुत याने शेट्टी यांना तो सी.आय.डी ऑफीसर आहे अशी बतावणी करुन त्यांच्या गळ्यातील चैन, हातातील आंगठी तसेच रोख रक्कम ८,९००/रुपये असा एकुण १,१८,९००/- किंमतीचा मुद्देमाल फसवणुक करुन घेवुन गेला होता. सदरबाबत मोहन सुरु शेट्टी यांनी नवघर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल्या वरून अनोळखी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषन करुन आरोपी मुन्नावर ऊर्फ अन्वर अब्दुल हमीद शेख, वय ४५ वर्षे, रा. सोनाजी घोसावलाच्या मागे, इब्राहीम आईची चाळ, कसाईवाडा, कुरेशीनगर, कुर्ला (प.) मुंबई यास नालासोपारा येथुन ताब्यात घेवुन दि.२७/०६/२०२२ रोजी अटक केली. तसेच आरोपीकडुन शेट्टी यांची फसवणुक केलेल्या मुद्देमालापैकी १,१०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत . अटक आरोपी हा फसवणुकीच्या गुन्हयांमध्ये सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द मुंबई, ठाणे, नवी मुंबई आयुक्तालयात तसेच पश्चिम बंगाल इ. ठिकाणी ४८ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ.शशीकांत भोसले, सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग, श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/सुशिलकुमार शिंदे (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/योगेश काळे, पोउनि/अभिजीत लांडे, पोहवा/भुषण पाटील, पोना/गणेश जावळे, पोशि/नवनाथ घुगे, सुरज घुनावत, ओमकार यादव, विनोद जाधव यांनी केलेली आहे.
