कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भत २७/०१/२०२१रोजी उच्छाधिकारी समितीची बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अथितीगृह येथे झाली.
कर्नाटक राज्यातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा याकरिता केंद्राकडे सर्व पक्षीयांनी एकजूट आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहेत. हे थांबवावे लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सातत्यापूर्ण पाठपुरावा करण्यात यावा. त्यासाठी समन्वयक मंत्री आणि सीमा प्रश्न कक्ष
यांनी वकील आणि विविध घटकांचा समन्वय करावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यानी दिले.
बैठकीत मुखमंत्री ठाकरे म्हणाले कि, दोन राज्यांचा वाद न्यायालयात असेल तर त्यामध्ये केंद्राने पालकाची आणि नि:पक्षपाती भूमिका घेणे अपेक्षित आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतांनाही कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहे. त्यामुळे या प्रश्नांचं निकाल लागेपपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्यासाठी तातडीने पाठपुरावा करावा लागेल.
हा मराठी भाग लवकरात लवकर महाराष्ट्रात यावा यासाठी सर्वानीच सर्व भेद, वाद विसरून एकत्र येऊन काम करावे लागेल. राज्यातील सर्व पक्षयांनी एकजुटीने केंद्राकडे हा भाग मराठीच आणि महाराष्ट्राचा असल्याचे आक्रमकपणे मांडावे लागेल. सीमा प्रश्नाचा न्यायालयातील पाठपुरावा सातत्यापूर्ण रित्या व्हावा यासाठी सीमा प्रश्न कक्ष आणि विविध यंत्रांनी समन्वयाने काम करावे लागेल.
