तुळींज : वृध्द तृतीयपंथीस मारहाण करुन ९,१७,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या इसमास तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली . दिनांक ०१/०४/२०२२ रोजी दुपारच्या दरम्यान वृध्द तृतीयपंथी यांच्या घरी आलेल्या इसमाने त्या झोपलेल्या असतांना चोरी करण्याच्या उद्देशाने त्याने तीच्या गळयाला साडी गुंडाळली त्यामुळे तक्रार दार हिला जाग येताच तिने प्रतिकार केला असता सदर इसमाने तीच्या तोंडात साडी कोंबली तसेच साडी हाताला गुंडाळुन तीला पलंगाला बांधले. पलंगाजवळ असलेले तिचे एकुण ९,१७,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली लाल रंगाची पर्स जबरदस्तीने चोरी करुन पळून गेला होता त्याबाबत तक्रारदार यांनी तुळींज पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने तुळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक पध्दतीने व गुप्त बातमिदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन नमुद गुन्हयातील आरोपी आयान रिझवान शेख, रा. कोलकत्ता, राज्य पश्चिम बंगाल यास अटक करुन त्याच्या कडुन ७,२१,०५० रु. किंमतीचे २४० ग्रॅम सोन्याचे दागिने व ८८,५००/- रु. रोख रक्कम, १ सॅमसंग मोबाईल असा एकुण ८,१०,५००/- रु किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच इतर दोन गुन्हयातील ५००० रुपये किंमतीचे २ भारत गॅसचे सिलेंडर व असा एकुण ८,१६,१७० रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडुन पोलिसांनी हस्तगत केला आहे .
सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री.संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, श्री.पंकज शिरसाट, सहायक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि./मिथुन म्हात्रे, स.पो.उपनि./बाळु बांदल, शिवानंद सुतनासे, पो.हवा/अनिल शिंदे, आनंद मोरे, पो.शि./अशफाक जमादार, सुखराम गडाख, विनायक राऊत, इस्माईल छपरीबन यांनी केलेली आहे.
