विरार : स्वता: च्या मुलावर चाकुने वार करुन फरार वडीलास २४ तासात अटक विरार पोलिस ठाणे, गुन्हेप्रकटीकरण शाखेची कामगीरी मिळालेल्या माहितीनुसार जय महाराष्ट्र चाळ सांताक्रूज मुबई पुर्व येथे राहणारे संदेश भरत बनसोडे, वय २५ वर्षे, याच्या भावावर निलेस भरत बनसोडे, वय २६ वर्षे, याच्यावर त्याच्याच वडील भरत बनसोडे यांनी धारदार चाकुने पोटावर पाठीवर वार करून त्यास गंभिर दुखापती करुन पळून गेले . यावरून संदेश भरत बनसोडे याने दिलेल्या तक्रारीवरून तक्रारीवरुन विरार पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याकारणामुळे सदर गुन्हयांतील आरोपी यास लवकरात लवकर अटक करण्यासाठी वरिष्ठांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हयांचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेने सुरु केला होता.
सदरचा गुन्हा करून फरार असलेल्या भरत बनसोडे बाबत कोणत्याही प्रकारची माहिती किंवा दुवा नसतांना गुप्तबातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीती आधारे आरोपी हा सांताक्रुज पुर्व, मुंबई येथे असल्याची माहीती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने सांताक्रूज पुर्व या ठिकाणी सापळा रचुन आरोपी भरत बनसोडे, वय ४७ वर्षे, यास ताब्यात घेऊन अवघ्या २४ तासाचे आत अटक करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगीरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, साहय्यक पोलीस आयुक्त, श्री. रामचंद्र देशमुख, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दिलीप राख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पो.उप निरी. संदेश राणे, पो. हवा. सचिन लोखंडे, संदीप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, पो. अं. मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार यांनी केली आहे.
