वसई : मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून. वालीव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २८/०१/२०२२ रोजी रात्री ०९.०० च्या सुमारास दिनेश रमाकांत रावते वय २७ वर्षे यास स्वेटरच्या लेसच्या सहाय्याने गळा आवळुन जिवे ठार मारले याबाबत बाबत त्याच्या मित्रा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीच्या आधारे मयत दिनेश रमाकांत रावते यांस त्याच्याच मित्राने म्हणजे किरण काकडया हिंगा याने गळा आवळून खून करून पळून गेला . सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिका-यांनी लागलीच वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना तपासाच्या सुचना केल्या. वरिष्ठांच्या सुचनांना अनुसरुन वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी गुप्त बातमीदारामार्फत आरोपीस यशस्वीरित्या वेळ न दवडता ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्हाची कबुली दिली.त्याची अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले कि त्याची पत्नी हि त्याचा मित्र मयत दिनेश रमाकांत रावते याच्याकडे मागील १ वर्षापासुन राहत होती. त्याच कारणांवरुन तो दिनेशबाबत आत्यंतिक द्वेष बाळगुन होता. दिनांक २८/०१/२०२२ रोजी याच कारणावरुन दोघांमध्ये वाद होऊन उदभवलेल्या वादातून आरोपीने स्वेटरच्या लेसच्या सहाय्याने दिनेश रावते याचा गळा आवळुन जिवे ठार मारून स्वत:ची अटक टाळण्यासाठी पळुन जात होता पण तो पळून जाण्याअगोदरच वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी आरोपीस यशस्वीरित्या ताब्यात घेतले आहे. वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी कौशल्याने गूप्त बातमीदार व घटास्थळाचे सुक्ष्म निरीक्षणाच्या आधारे खुनाचा गंभीर गुन्हयाची गुन्हा दाखल झाल्यापासुन अवघ्या १२ तासात उकल करुन व आरोपीस ताब्यात घेवून उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
वरील कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – २ वसई, श्री. पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. मिलिंद सांबळे, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, सपोनि/ज्ञानेश फडतरे, पोउनिरी/प्रशांत चव्हाण, पोहवा/मुकेश पवार, मनोज मोरे, पोना. सचिन दोरकर, किरण म्हात्रे, राजेंद्र फड, सतिष गांगुर्डे पो.अंम. गजानन गरीबे, सूर्यकांत मुंढे, सचिन खताळ, जयवंत खंडवी, विनायक कचरे यांनी तत्परतेने पार पाडली आहे.
