भाईंदर : Axis Credit Card अपडेट करण्याचे सांगून फसवणूक केलेल्या रक्कमपैकी ७९,४००/ रुपयाची रक्कम परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत नालासोपारा परिसरात राहणारे रहिवाशी यांना अनोळखी इसमाने फोन करुन “ तुमचे क्रेडीट कार्ड अपडेट करण्याचे आहे सांगून फोनद्वारे आपले काही डिटेल्स लागतील.” असे सांगून तक्रारदार यांचे बँकेची माहिती घेवून बँक खात्यामधून ९९,२००/- रुपये रक्कम काढून घेण्यात आलेबाबत तक्रार अर्ज सायबर गुन्हे कक्ष येथे दिनांक २३/०९/२०२२ रोजी प्राप्त झाला होता.
नमूद तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे बँक ट्रॅन्झक्शनची माहीती प्राप्त करुन त्याचे अवलोकन करता तक्रारदार यांची फसवणूक रक्कम मोबिक्वीक या प्लॅटफॉर्मवर गेल्याचे दिसून आल्याने संबधित कंपनीसोबत पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन तक्रारदार यांच्या फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी ७९,४००/- रुपये पुन्हा तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आले आहे.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी… .
- अशा प्रकारे फसव्या कॉलला उत्तर देवू नका.
- कॉल आलेल्या व्यक्तीकडे आपले बँक खाते, जन्म दिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती उघड करु नका.
- कोणत्याही अनोळखी कॉल आल्यास त्याची विश्वासर्हता पडताळणी करुन घ्यावी.
- कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करु नका.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे कोणी फसवणूक करीत असल्याचे आढळुन आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार यावी.
सदरची कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) अति. कार्यभार पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, पो.उप.निरी. प्रसाद शेनोळकर, म.पो.शि. माधूरी धिंडे, सुवर्णा माळी, मसुब आकाश बोरसे यांनी पार पाडलेली आहे.
