नागपूर : नागपूर सर्वोच्च न्यायालयाने यावेळी एका बलात्कार या याचिकेवर महत्वाचा निर्णय देत पुरुष वर्गास दिलासा दिला आहे. जर महिला व पुरुष बालिक व समजदार असतील व त्याच्यात शारीरिक संबंध निर्माण झाला असेल तर तो बलात्कार होऊ शकत नाही असा निर्णय नागपूर सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे नागराज पंजाबराव कुमरे (वय : २२) याच्या वर एका तरुणीने ६ ऑक्टोबर २००६ ला घाटंजी पोलीस ठाणे जिल्हा यवतमाळ येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता . यात आरोपी वर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला व त्यात ती गरोदर झाली ह्या आरोपा खाली यवतमाळ सत्र न्यायालयाने साक्षीदार व युक्तिवादाच्या आधारे आरोपीस बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी ५ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती . या सुनावणी विरुद्ध आरोपी याने उच्च न्यायालयात अपिल केले होते. या अपीलावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यांनी सूक्ष्म पणे याची पूर्ण शहानिशा करून असा निर्णय सांगितला कि आरोपीने कधीच महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचे दिसून येत नसून दोघे हि सज्ञान असून त्यांनी सहमतीने शारीरिक सबंध ठेवले असून त्यात महिला गरोदर राहिली व हा सर्व प्रकार कुटुंबासमोर उघड झाल्याने तिने पोलिसात तक्रार नोंदविली, तसेच तरुणीच्या जबाबावरून तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्ती केली आहे असे दिसून येत नाही. याकारणास्तव सहमतीने ठेवलेला शारीरिक सबंध हा बलात्कार होऊ शकत नाही. असे न्यायालयाने स्पष्ट केले व आरोपीला दोषी न ठरवता त्याची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.
