सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काशिमिरा युनिट गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन पाटील आणि पथक पेट्रोलिंग करत असताना ब्रँड फॅक्टरी समोर, हाटकेश, मीरा रोड पूर्व येथील रोडवर मोटरसायकलने एक व्यक्ती संशयीत पोलीसांना दिसून आला. त्यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ ६० ग्राम एम.डी. किंमत ६,०००००/- रुपयांचे अमली पदार्थ स्वतः जवळ बाळगून बेकायदेशीररित्या विक्री करीत असल्याचे मिळून आले.
म्हणून आरोपी विरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७५/२०२१ एन.डी.पी.सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास काशिमिरा पोलुस करत आहे.
सदरची कामगिरी श्री विजयकांत सागर, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमिरा युनिट गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक. चेतन पाटील आणि पथक यांनी केली आहे
