मिरारोड : सज्जाद सय्यद याचे रा. रुम नं. ६०३, एन जी प्लाझा बिल्डींग नं. ३,लोढा रोड, मिरारोड पुर्व याठिकाणी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा वापर होत असल्याची माहिती गुजरात राज्याचे ए. टी. एस. चे पोलीस अधीक्षक श्री. परमार साहेब यांनी दिली त्याआधारे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी मा. वरिष्ठ अधिकारी यांना माहीती देउन सज्जाद सय्यद याच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरामध्ये परदेशातून भारतात संपर्क साधण्यासाठी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सुरु असलेले मिळून आले. सज्जाद सय्यद याच्याकडे याविषयी विचारले असता त्याने त्याचे घरामध्ये मिळून आलेल्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा वापर परदेशामध्ये राहणारे लोक भारतामध्ये संपर्क करण्यासाठी केला जातो अशी माहिती दिली. या प्रक्रियेमध्ये भारतीय BSNL Getway चे बायपास केले जात असल्यामुळे भारतीय सरकारला मिळणारा महसुल बुडवीला जातो. तसेच सदरचे कॉल हे भारतीय BSNL Getway मधुन जात नसल्यामुळे त्याचे निरीक्षण व निगराणी केली जावू शकत नाही. त्यामुळे अवैध कृतीकरीता याचा वापर करून अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजद्वारे त्यांना पैसे प्राप्त होतात.सदर ठिकाणाहून ३२ सिमकार्ड स्लॉट चे ३ सिमबॉक्स, १२५ सिमकार्ड, सिमबॉक्सला जोडलेले अॅण्टीना, हॅथ वे कंपनीचा राउटर, मिनी लॅपटॉप, लॅन पोर्ट स्विच, लॅन केबल इ. असे एकुण रु ३,४२,५००/- किं. चे साहीत्य मिळून आले. सदरबाबत नयानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष – १, काशिमिराचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सपोनि. कैलास टोकले, पोउपनि हितेंद्र विचारे, पुष्पराज सुर्वे, सपोउपनि राजु तांबे, स.फौ. एम.के. वेदपाठक, पोहवा-वाडीले, शिंदे, गर्जे, पठाण, पो.ना. संतोष लांडगे, विजय गायकवाड, थापा, सावंत, सुमित जाधव, पोशि विसपुते व राजपुत यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढिल तपास पोलीस निरीक्षक अविराज कुराडे हे करीत आहेत.
