मिरारोड – चैन स्नॅचिंग व मोबाईल स्नॅचिंगच्या एकुण ३ गुन्हयातील अनोळखी आरोपीनां अटक करुन गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात – मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. मिळालेल्या माहीतीनुसार,मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणा-या श्रीमती प्रतिभा प्रकाश गोरे वय.६१ वर्षे, रा.रुम नं. ३०२, ई विंग सालासर आंगण रोनक हॉटेल जवळ, रामदेवपार्क, मिरारोड पुर्व ता.जि. ठाणे यांनी दिनांक १३/१२/२०२३ रोजी तक्रार दिली कि, त्या व त्यांची मुलगी नंदा प्रकाश गोरे असे रामदेव पार्क रोड येथे भाजी विकत घेण्यासाठी गेले होते. तेथुन भाजी विकत घेवुन रामनगर चौकातुन घरी पायी चालत परत येत असतांना सालासर वुड सोसायटीच्या समोरील रस्त्यावर आले असता एका अनोळखी व्यक्तिने त्यांच्या पाठीमागुन एका पांढऱ्या रंगाचे स्कुटी मोटर सायकलवरुन येवुन फिर्यादी यांचे गळयातील सोन्याची बोरमाळ जबरीने खेचुन चोरी करुन पळुन गेला म्हणुन त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मिरारोड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा उघड होण्याकरीता मा.वरीष्ठांना गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाती अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच आरोपी गुन्हयाचे ठिकाणी येण्याचे व गुन्हा करुन जाण्याचे मार्गावरील १०० ते १५० सी. सी. टी. व्ही फुटेज चेक करुन गुन्हयातील आरोपीस निष्पन्न करुन आरोपी वसीम फय्याज शेख वय २८ वर्षे रा. सी / ६०२, गौरव पॅराडाईज, दस्तर खान हॉटेलजवळ, बेव्हर्लीपार्क मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे यास अटक करुन त्यांचे कडुन गुन्हयात वापरलेली मोटर सायकल व गुन्हयात चोरी केलेले १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण ७५,०००/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच मिरागाव परिसरात राहणारे श्री. दादासाहेब विश्वनाथ खेजे वय . ६१ वर्षे, रा.००५/बिल्डींग नं. १४, पार्थ को. ऑ. सोसायटी, कृष्ण स्थळ कॉम्पलेक्स मिरागाव, मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे हे दिनांक २२/१२/२०२३ रोजी तक्रार दिली कि, ते राहत्या घरातुन वॉकिंग करीत एस. के. स्टोन बाजुकडुन मिरारोड रेल्वे स्टेशनकडे जाणा-या रस्त्याने पायी चालत जात असतांना महाराजा बॅक्वेट हॉल समोर आले असता एका अनोळखी इसमाने त्यांचे हातातील मोबाईल फोन हिसकावुन चोरी करुन पळुन गेला म्हणुन त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मिरारोड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली असता गुन्हयाचे घटनास्थळी सी. सी. टी. व्ही फुटेज उपलब्ध नसतांना देखील तांत्रिक विश्लेषणा आधार गुन्हयातील आरोपीस निष्पन्न करुन आरोपी शोएब हुसैन खान वय.२२ वर्षे रा.रुम नं.००४/शिमला कॉम्प्लेक्स, महाराजा बँक्वेट हॉलच्या बाजुला मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे यास अटक करुन त्यांचे कडुन गुन्हयात वापरलेली मोटर सायकल व गुन्हयात चोरी केलेले मोबाईल फोन असा एकुण ६६,०००/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
त्याचप्रमाणे भाईंदर परिसरात राहणारे श्री. आशुतोष शिवप्रकाश ओझा वय. ३४ वर्षे, व्यवसाय:-मोबाईल शॉप, रा. डी / ३०२, पद्मनाभ दर्शन, मिरा भाईंदर रोड, दिपक हॉस्पिटलसमोर, भाईंदर पूर्व ता. जि. ठाणे यांनी दिनांक ०९/०१/२०२४ रोजी फिर्याद दिली कि, ते शांतीपार्क परिसरात त्यांचा मित्र येणार असल्याने त्याची वाट बघत त्यांचे मोबाईल मधील बँकिंग ॲप बघत असतांना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या हातातील मोबाईल हातावर फटका मारुन जबरीने खेचुन चोरी करुन पळुन गेला म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मिरारोड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा उघड होण्याकरीता मा.वरीष्ठांना गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन फिर्यादी यांनी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे आरोपींचे वर्णन गोपनियबातमीदारांना सांगुन त्यांचेकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हयातील दोन आरोपी १) मोहम्मद फरहान इक्बाल अन्सारी वय.२२ वर्षे, रा.रुम नं. २७९२, रायगड चाळ, डोंगरी काशिमिरा, मिरारोड पुर्व ता.जि.ठाणे व २) दिलीप खगेंद्र भुल वय १९ वर्षे, व्यवसाय :-कराटे रा.बी/६०३, रितु पॅराडाईज फेस ०२, जी.सी.सी. क्लब जवळ, पुनमगार्डनच्या पुढे मिरारोड पुर्व ता.जि.ठाणे यांना अटक करुन त्यांचे कडुन गुन्हयात वापरलेली मोटर सायकल व एक मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला असुन आरोपी कडे तपास चालु असुन गुन्हयात जबरी चोरी केलेला मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, मिरारोड, श्री.महेश तरडे सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पाटील (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि / संतोष सांगवीकर, पोउपनि / किरण वंजारी, पोउपनि/ गजानन जिंकलवाड, स. फौ. प्रशांत महाले, पोहवा / प्रफुल्ल महाकुलकर, प्रदीप गाडेकर, बालाजी हरणे, परेश पाटील, तानाजी कौटे, पो. अमं. शंकर शेळके, अथर्व देवरे यांनी केलेली आहे.
