सराईत महिला आरोपीस दादर रेल्वे पोलीस ठाणे यांनी केली अटक.

Crime News

दादर :  सॅन्ड्रा बावतीस लोबो. वय – ३२ राह. विरार (पुर्व) या दिनांक १४/०९/२०२१ रोजी दादर इथून लोकलमधील महिला डब्यात चढत असतांना गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात महिलेने त्यांच्या पाढीमागे  अडकवलेल्या सँगबॅगची चैन खोलुन एकुण – १९,५००/- रुपये  डायरी व इतर किरकोळ साहीत्य, जुने कार्यालयीन ओळखपत्र असे चोरी करून पळून गेली याबद्दल लोबो यांनीं दि. – ०७/१०/२०२१ मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे  येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील महिला व चोरीस गेलेला माल यांचा तपास लावण्यासाठी अधिकारी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी / अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सी. सी. टि. व्ही. कॅमेऱ्यांचे रेकॉडींग प्राप्त करुन त्यातील संशयीत महिला आरोपीचा फोटो डेव्हलप केला त्यावरून सदर महिला आफरीन अली अहमद अन्सारी. वय – १९ वर्षे, राह.कुर्ला (प) मुंबई   हिच्यावर या आधी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले

दि. ६/१०/२०२१ रोजी आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी   दादर रेल्वे स्टेशन (पश्चिम) येथे पोलीस शोध घेत असताना सदर महिला त्यांना दिसून आल्याने तिला लागलीच चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले व तीची  तपासणी केली असता वरील गुन्हा तिनेच केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले सदर महिले विरुद्ध एकूण १४ गुन्हे असल्याचे उघडकीस आले आहे. त्यावरून तिला अटक करण्यात आली  व चोरीस गेलेला माल तिच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कामगिरी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मेहबुब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार मपोहवा. व्ही. एन. चव्हाण., मपोशि. एस. पी. करंजेकर. व गुन्हे प्रकटीकरण पथक १ व ५ मधिल स्टाफ यांनी  तपासात अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.

 

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply