नायगांव : दिनांक ०२/१०/२०२१ रोजी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, नायगांव (पुर्व), डॉन बॉस्को स्कुल जवळील साई दर्शन बिल्डींग मध्ये नायजेरीयन नागरीक हे अंमली पदार्थ विक्रीकरीता घेवून आलेले आहेत.सदर मिळालेली बातमी वरिष्ठांना कळवुन डॉ. श्री महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांच्या परवानगीने व मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला . त्या दरम्यान नायगांव (पुर्व), डॉन बॉस्को स्कुल जवळील साई दर्शन बिल्डींग मधील ए विंग, रुम.क्र.४०३ मध्ये राहणारे १) ओशीता डोझी चिबुझी वय ३६ वर्षे, मुळ रा., देश-नायजेरीया २) ईझे इकेने वय २९ वर्षे, रा. मुळ रा. देश-नायजेरीया ३) ईबुका किंग्सले अच्युनिलो वय ३२ वर्षे, रा. मुळ रा. नायजेरीया यांच्या जवळ एकुण ११२६ ग्रॅम वजनाचा केटामाईन नावाचा व १३ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन नावाचा एकुण १०,५६,०००/-रु. किंमतीचा अंमली पदार्थ मिळुन आला. हे अंमली पदार्थ केटामाईन व मॅफेड्रॉन जप्त करण्यात आलेले असुन नायजेरीयन आरोपींविरुध्द अंमली पदार्थ कायदया नुसार वालीव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयात तीन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. याचा अधिक पुढील तपास वालीव पोलीस ठाणे करीत आहे
सदरची कारवाई श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांचे परवानगीने व श्री. रामचंद्र देशमुख सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. देवीदास हंडोरे, सपोनि. श्री. विलास कुटे, मसपोनि. तेजश्री शिंदे नेम-भरोसा सेल, पो.हवा. धनाजी इंगळे, पो.ना.पवन पाटील, पो.शि. चव्हाण, अजय यादव, विष्णुदेव घरबुडे, मपोशि. जाधव, पोना/विनोद राऊत, पो.ना.शिवाजी पाटील, पो.ना. राजाराम काळे नेमणुक-मध्यवर्ती गुन्हे शाखा, पो.ना. रोशन किणी, मपोहवा. डोईफोडे नेमणुक-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा विभाग यांनी केली आहे.
