मालाड : गर्दीचा फायदा घेऊन पैशांची बॅग चोरी करणाऱ्या टोळीला त्यांच्या टोळी प्रमुखासकट दिंडोशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती अशी कि दिनकी २५/४/२०२२ व २६/४/२०२२ रोजी इनेश चिमनलाल संघवी, वय-४५ वर्षे व प्रशांत प्रेमनाथ तिवारी, वय-३३ वर्षे हे मालाड स्टेशन जवळून जात असतांना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या हातातील ३,५०,०००/- व ९८,७००/- रुपये पैशानी भरलेली बॅग आरोपी यांनी चोरी केली होती त्यावरुन दिडोशी पोलीस ठाणे येथे वरप्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरचे दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर लागलीच कक्ष-११ कडील पोनि पाटील, सपोनि भारत घोणे, सपोनि विशाल पाटील व अंमलदार यांनी लागलीच घटनास्थळी जावुन तेथुन माहीती प्राप्त केली. सदर गुन्हयातील अनोळखी इसमाचा शोध घेण्यासाठी पोनि विनायक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ३ पथके तयार करून तिनही पथकांनी घटनास्थळाच्या आजुबाजुच्या सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करुन संशयीत इसमांचे फुटेज प्राप्त करून . सदर फुटेजमधील दोन व्यक्ती हे मालाड येथे येणार असल्याबाबत गोपनीय माहिती अंमलदार गायकवाड यांना प्राप्त झाली त्या अनुषंगाने त्यांनी टिम तयार करुन सापळा लावला असता दोन संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले व त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे साथिदार यांचे मदतिने केला असल्याचे सांगीतल्याने लागलीच दोन टिम हया अंधेरी पश्चिम येथे पाठविण्यात येवुन सदर टोळीचा टोळी प्रमुखासह तिन संशयीतांना अंधेरी येथुन ताब्यात घेण्यात आले असून सर्व संशयीत आरोपीकडे केलेल्या चौकशी मध्ये त्यांनी दिंडोशी पोलीस ठाणे येथे दाखल वरील दोन्ही गुन्हे वेगवेगळया साथिदारांकरवी केले असल्याची कबुली दिली आहे.अटक केलेल्या आरोपीवर यापुर्वी दाखल वेगवेगळया पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून सदर पाचही अटक आरोपी यांना पुढील कारवाई कामी दिंडोशी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. सुहास वारके, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. एस. विरेश प्रभू, मा. पोलीस उप-आयुक्त (प्र-१) श्री. दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण-उत्तर) श्री. काशिनाथ चव्हाण यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पो. नि. विनायक चव्हाण, पो.नि. मानसिंग पाटील, स.पो.नि. भरत घोणे, स.पो.नि. विशाल पाटील, म.स.पो.नि. पुनम यादव व अंमलदार चंद्रसेन गायकवाड, सुधीर तरटे, गिरीष सुर्वे, जयेश केणी, अजय कदम यांनी पार पाडली.
