कल्याण : प्रणव अनंत बाडागळे राह कुर्ला . यांचा प्रवासा दरम्यानदोन रेडमी व इन्फिनिक्स कंपनी चे किंमत अंदाजे २५,७००/- रुपये मोबाईल हरवले होते त्याबद्दल त्यांनी तक्रार केली होती त्यानुसार कल्याण रेल्वे पोलीस ठाणे यांनी शोध घेऊन माननीय रेल्वे पोलिस आयुक्त सो. दिनांक ११/०९/२०२१ रोजी प्रणव बाडागळे यांस त्यांचा मुद्देमाल परत दिला आहे. त्याचप्रमाणे . दिनांक ११/०९/२०२१ रोजी अशोक वाळू दळवी राह. भिवंडी यांचा हरवलेला मोबाईल फोन किंमत अंदाजे १६,९९९/- रुपये त्यांना वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार सपोफौ कोळी, पोशि. दामेधर , मपोशि. जाधव, यांना परत दिला आहे त्याबद्दल त्यांनी कल्याण रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
चर्चगेट : दिनांक ११/०९/२०२१रोजी पोशि बडगुजर हे चर्चगेट रेल्वे स्टेशन येथे मपोहवा भालेराव, पोना खरतुडे पोशि मोहीते यांच्या बरोबर असताना १२.१८ वा चे दरम्यान फलाट क्रमांक ३ व ४ वर गस्त करीत असताना विरार फास्ट लोकल ट्रेन मध्ये दोन नंबर च्या कोच मध्ये एक नेव्ही ब्लू रंगाची बॅग मिळुन आली. बॅग मध्ये प्रवासी यांचा मोबाईल नंबर मिळून आल्याने प्रवासी यांना संपर्क साधला असता प्रवासी हिम्मतलाल शिवलाल शाह वय ५५ वर्ष राह. दहिसर पूर्व त्यांना चर्चगेट रेल्वे स्टेशन येथे बोलावून सदर ची बॅग ही त्यांचीच असल्याची खात्री करून व त्यामधे असलेले रोख रक्कम २०,०००/- रुपये असे ठाणे अंमलदार यांचे समक्ष ताब्यात दिले. प्रवाशांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
मुंबई सेंट्रल : दिनांक ११/०९/२०२१ अनिल भाडरे, यांना एक काळ्या रंगाची सँगबॅग लोकलमध्ये बेवारस मिळून आली त्यांनी त्यावेळी ती बॅग डयुटी वर असलेले सपोफौ बाईत मपोहवा,मपोशि यांना दिली . सदर बॅग तपासून पाहता त्यात काळ्या रंगाचे पाकीट त्यात SBI, AXIS, IDBI व पोष्टाचे डेबीट कार्ड इतर किरकोळ कागदपत्र मिळून आले. त्यावर महादेव पांडुरंग जाधव, राह. विरार असे मिळून आल्याने नमुद प्रवाशास संपर्क करुन बोलावून घेऊन खात्री नमुद सँगबॅग आतील सामानांसह व महत्वाचे कागदपत्रांसह त्यांच्या ताब्यात दिली. त्यांनी पोलीसांचे आभार मानले आहेत.
