नागपाडा: गुन्हे प्रकटीकरण शाखा, यांना दिनांक ०८/०९/२०२१ रोजी गुप्त बातमीदारांकडून माहिती प्राप्त झाली कि , कलर्स बॅग्ज, २१, घेलाभाई रोड, मदनपुरा, नागपाडा, मुंबई-०८ या ठिकाणी एक इसम व्ही.आय.पी. | कंपनीच्या ‘स्कायबॅग’ या बॅण्डच्या बनावट बॅगा बनवून विक्री करीत आहे. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण शाखा,गु.अ.वि., कक्ष-४ चे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले. व सदर पथकाने बातमीदारासह घटनास्थळी जावून दोन पंचांसमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी एकुण रू. ४१,२४,१६९/- किंमतीच्या व्ही.आय.पी. कंपनीच्या ‘स्कायबॅग’ या बॅण्डच्या एकुण २२५५ बॅगा, ३६,000 लेबल व १९७५ चैन इत्यादी साहित्य मिळून आले. सदरबाबत पंचनामा करून नमूद व्ही.आय.पी. कंपनीच्या ‘स्कायबॅग’ या बॅण्डच्या बॅगा व इतर साहित्य तसेच सदरच्या बॅगा बनविणाऱ्या इसमास ताब्यात घेवून त्याच्या विरूध्द नागपाडा पोलीस ठाणे येथे कॉपी राईट अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पुढील तपास चालु आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त(गुन्हे) श्री मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री एस विरेश प्रभु, मा.पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), श्री. प्रकाश जाधव, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-मध्य), श्री. नितीन अलकनुरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, सपोनि. यशवंत शिंदे, सफौ. राजेंद्र राऊत, पोह. अजय बल्लाळ, संदिप कांबळे, संदिप तळेकर, पोशि. अनुपम जगताप, पोशि. संजय गायकवाड, सुशिल साळुखे, किरण चावरेकर यांनी पार पाडलेली आहे.
