विरार मध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत टेलर व गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्याने तांत्रिक तपास करून व गुप्त बातमीदारांन कडून माहिती प्राप्त केली आणि मोबाईल दुकान फोडून चोरी करणारा युवक आरोपी नामे रोहित हडळ, राहायला मनवेलपाडा, विरार पूर्व याला ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणुन आरोपी कडून ३५,०००/- रुपये किमतीचे १० मोबाईल आणि ०२ स्पीकर हस्तगत करण्यात आले.
सदरची कामगिरी श्री प्रशांत वाघुंडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ श्रीमती. रेणुका बागडे , सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे आणि पथक यांनी केली आहे.
