दिनांक: १६/०७/२०२१ ; माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदारासोबत माणिकपुर नाका परिसरामध्ये १० ते १२ इसमांची गुन्हेगारी टोळीने मोबाईल खेचणे , मोटार सायकल चोरी , इ . प्रकारचे गुन्हे करत असल्याची कबुली दिली आहे . त्याचे माहितीवरून अटक आरोपी नाव: १) मॅक्स उर्फ अंबाडी दुशांत पनीकर वय :१९ रा. वसई पश्चिम २) जिवन तुकाराम जाधव वय : २८ रा. मेरी व्हील , वसई पश्चिम ३) सिद्धेश महेश तावडे वय : २० रा. वसई पश्चिम ४) रोशन शंकर वाघे वय : २१ वसई पश्चिम ५ ) अजित लालजी सिंह वय : २१ रा. माणिकपुर वसई पश्चिम ६ ) अजय उर्फ बाबू लालजी सिंह वय : २१ रा. माणिकपुर वसई पश्चिम ७ ) धनजित बळीराम शर्मा वय : २१ रा. वसई पश्चिम यांना अटक करण्यात आली आहे.
सदर अटक आरोपी यांच्याकडे चौकशी करून नमूद गुन्हयातील वेग वेगळ्या कपंनीचे ८५ मोबाईल फोन , ५ मोटार सायकल , गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटार सायकल व इतर मुद्देमाल असे एकुण रु. ५,७१,१००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून ३ मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे , ५ मोटार सायकल गुन्हे, २ घरफोडीचे गुन्हे, ४ चोरीचे गुन्हे असे एकुण १४ गुन्हयांची उकल करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील पोलीस उप. आयुक्त परिमंडळ ०२, श्री. प्रदीप गिरीधर सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अभिजीत मडके , पोलीस निरीक्षक , माणिकपुर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो .नि . सचिन सानप , पोउनि. रोहिणी डोके, पो.हवा. शैलेश पाटील, पो.ना. धनंजय चौधरी , शामेश चंदनशिवे , कल्पेश केणी, पो. शि . किरण आव्हाड , हेमंत कोरडे , गोपाळ कोळेकर, म. पो. शि . कांबळे यांनी केली आहे.
