मिरारोड : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकाचे पोलीस अंमलदार उमेश पाटील यांना दिनांक १३-१२-२०२१ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती कि मिरारोड पूर्व येथे राहणारा सुधीर हा वेश्या व्यवसाय चालवतो व वेश्यागमनाच्या मोबदल्यात गिऱ्हाईकांना मिरा-भाईंदर परिसरातील लॉजमध्ये मुली पुरवितो. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस. एस. पाटील यांनी बोगस गिहाईक व पंच यांना जलाजा लॉज आवारात, मच्छी मार्केट, मिरा-भाईंदर रोड, मिरारोड पूर्व या ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळुन पोलीस पथकासह दिनांक १३-१२-२०२१ रोजी छापा टाकला असता दयाली उर्फ सुधीरचरण साव वय-३६ वर्ष, रा. गणेशनगर चाळ, बोरीवली पुर्व, हा वेश्यागमनाच्या मोबदल्यात पुरुष गि-हाईकांना मुली पुरवित असतांना मिळुन आल्याने सदर बाबत पोहवा/ उमेश हरी पाटील यांनी सरकारतर्फे तक्रार नोंदविली असल्यामुळे आरोपी विरुध्द नयानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. श्री. संपतराव पाटील, पो.हवा. उमेश पाटील, विजय निलंगे, पो.अंम. केशव शिंदे, मपोना वैष्णवी यंबर, मपोशि सुप्रिया तिवले, चा. पोना गावडे सर्व नेम. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी केली आहे.
