ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये २४ ऑक्टोंबर पर्यंत मनाई आदेश लागू.

Regional News

ठाणे दि. ११/१०/२०२१:- पोलीस अधिक्षक ठाणे (ग्रामीण) यांचे कार्यकक्षेतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.०९/१०/२०२१ रोजीचे १२ .०० वाजल्या पासुन ते दि. २४/१०/२०२१ रोजीचे १२ .००वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) जिल्हाधिकारी ठाणे  राजेश नार्वेकर यांनी खालील बाबीसाठी मनाई आदेश जारी केले आहे.

शस्त्रेतलवारीभालेदंडेसोटेबंदूकासुरेलाठया अथवा काठया अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयची उपकरणे किंवा साधने बाळगणेजमा करणे किंवा लोकांत प्रचार करणे. व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणेगाणी म्हणणेवाद्य वाजविणे. यामुळे सभ्यता अगर नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वेहावभाव करणेसॉग आणणे किंवा चित्रेचिन्हेफलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकांत प्रचार करणे. पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी.

सदरचा आदेश प्रेतयात्रालग्नाची मिरवणूक तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांच्या लेखी परवानग्या घेवून काढलेल्या मिरवणूकीस लागू असणार नाही. तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरिष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्वामुळे लाठीकाठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागू असणार नाही.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply