पालघर : बाळांतीण डोगंराच्या परिसरात पळशीन पो. पिपळशेत ता. जव्हार जि.पालघर येथे दिनांक १०/०७/२०२१ रोजी १२. ०० वा . ते दिनांक ११/०७/२०२१ रोजी १०. ३० वाजताचे पूर्वी फिर्यादी यांनी आपली आई मयत नाव : गुलाब शांताराम लाखन वय :४० हि त्यांचे शेतावर काम करण्यासाठी गेली होती. ती सायंकाळी नेहमीप्रमाणे परत घरी न आल्याने फिर्यादी व त्यांचे गावातील लोकांनी मयत हिचा गावात व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता तीचे प्रेत हे दिनांक ११/०७/२०२१ रोजी १०.३० वाजता बाळांतीण डोगंराच्या परिसरात अंदाजे १५० मीटर अंतरावर डोंगरउतारावर उक्षीच्या झाडा झुडपाजवळ मयत स्थितीत मिळून आलेले असून तिला कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून जिवेठार मारूनटाकलेले आहे म्हणून जव्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोनि अप्पासाहेब लेंगरे , प्रभारी अधिकारी जव्हार पोलीस ठाणे हे करीत आहेत .
मा. श्री. दत्ताञय शिंदे, पोलीस अधीक्षक , पालघर, मा. श्री. प्रकाश गायकवाड , अपर पोलीस अधीक्षक , पालघर यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. विकास नाईक ,उप विभागीय पोलीस अधिकारी , पालघर विभाग यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे पोउनि आशिष पाटील, व स्टाफ यांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती प्राप्त करून आरोपी वय : ३२ रा. पळशीन जि . पालघर यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने अनैतिक संबंधातुन खून केल्याचे निष्पन्न झाले.
सदरची कामगिरी मा. श्री. दत्ताञय शिंदे, पोलीस अधीक्षक , पालघर, मा. श्री. प्रकाश गायकवाड , अपर पोलीस अधीक्षक , पालघर यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. विकास नाईक ,उप विभागीय पोलीस अधिकारी , पालघर विभाग, पोनि अप्पासाहेब लेंगरे, प्रभारी अधिकारी जव्हार पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे पोउनि आशिष पाटील , व स्टाफ सफौ . सुनील नलावडे , पोहवा दीपक राऊत , पोहवा सरदार , पोहवा डोंब , पोना नरेद्र पाटील , पोना . कैलास पाटील यांनी केली आहे.
