दिनांक : १७/०७/२०२१ : कोरोना महामारीत जनजीवन हळूहळू सुरळीत होत असताना आता उपनगरीय व मेलगाडीने प्रवास संख्येत वाढ होत आहे . तसेच लॉकडाऊन मुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने परिणामी गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हयांना प्रतिबंध होऊन प्रवाशांच्या सुरक्षेकरिता मा. पोलीस आयुक्त श्री कैसर खालीद साहेब व मा. पोलीस उप. आयुक्त,पश्चिम परिमंडळ ,लोहमार्ग मुंबई श्री. प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पोलीस ठाणे अभिलेखावरील दाखल गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एम. ए. इनामदार यांनी अभ्यास करून पोलीस ठाणेतील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी / अंमलदार यांना जास्तीत जास्त गुन्ह्यांना प्रतिबंध करून दाखल गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथेदाखल गुन्हयांतील फिर्यादी उमेशकुमार भगवानसिंग मिना वय :२६ रा. नेरळ हे दिनांक १६/७/२०२१ रोजी जयपुर एक्सप्रेस ने प्रवास करीत असतांना सदर गुन्हयांतील ०३ आरोपी यांनी आपसात संगनमत करून उमेशकुमार यांचा ९,९००/-रु. किं . मोबाईल जबरीने चोरी करून पळून जात असताना फिर्यादी यांनी त्यातील एका आरोपीस पकडले आरोपी नाव: अनुप हरिषकुमार मिश्रा वय :१९ रा. वापी यास पकडून रेल्वे सुरक्षा बलाचे मदतीने पोलीस ठाण्यात हजर करून आरोपी विरुद्द तक्रार करून गुन्हा नोंदविण्यात आला . अटक आरोपीचे साथीदार मात्र चालते गाडीतुन रेल्वे ट्रक मध्ये उडी मारून पळून गेले.
सदर गुन्ह्यातील अटक आरोपी याचे कडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शी. एन. एन. जाधव व गुन्हे प्रकटीकरण स्टाफ यांनी विश्वासात घेवुन आरोपीची कसुन चौकशी केली असता आरोपी हे परराज्य वापी येथील रहिवाशी असल्याची त्रोटक माहित प्राप्त झाली . सदर माहितीवरून पोलीस निरीक्षक श्री. जाधव व गुन्हे प्रकटीकरण पथक लागलीच गुप्तबातमीदार यांना माहिती देवुन वापी राज्य गुजरात येथे जावून तेथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी यांचेशी संपर्क साधुन नमुद आरोपी यांचे वर्णन देवुन त्यांचे मदतीने नमुद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी १) मनोज उर्फ टकला फुलचंद गुप्ता वय : २२ रा. वापी २) राहुल गोपाल सिंग वय : २१ रा. वापी यांनी वापी येथुन शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस ठाणेत आणुन नमुद गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हस्तगत करून गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे.
सदर कामगिरी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मेहबूब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली पोनि . श्री. एन. एन . जाधव . पोलीस उप निरीक्षक श्री. एस. जे. कदम , पो.हवा. डी . जी . गोपाळे , हवा डब्ल्यू . ए. शेख , पो हवा. एन. वाय . खाडे , पो. ना. एस. एस. कांबळे , पो. शि . पी. आर. होनमाने यांनी नमुद गुन्ह्याचे तपासात अंत्यत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
