दिनांक २७. ०७. २०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री. एस . एस . पाटील यांना त्यांच्या विश्वसनीय खबऱ्याकडून माहिती प्राप्त झाली की , इसम नामे अरविंद हा अंधेरी पुर्व परिसरात राहत असून ऑनलाईन जाहिरातीद्वारे व मोबाईल क्रमांकावर गिऱ्हाईकांशी संपर्क साधून तो वेश्या व्यवसायासाठी वसई व मीरा भाईंदर परिसरातील लाँज मध्ये रुम बुक करावयास लावून किंवा गिऱ्हाईकाचे सोयीनुसार वेश्यागमनाचा मोबदला घेऊन गिऱ्हाईकास मुली पुरवितो. सदर बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस . एस. पाटील यांनी बोगस गिऱ्हाईक व पंच यांना मीरा भाईंदर रोड वरील लाँज वर, मीरारोड पुर्व या ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळुन पोलीस पथकासह दिनांक २७/०७/२०२१ रोजी १७. १० वा. छापा टाकला असता वेश्यादलाल राजेश परमेश्वर चौरसिया , वय ३८ वर्ष रा. नित्यानंद चाळ , बाफाने फाटा , नायगाव पुर्व तालुका वसई , जि . पालघर , मूळ रा. ग्राम बभनी पांडे , पो. ठाणे खुकुंद , ता. सलेमपूर , जि . देवरीया , राज्य उत्तरप्रदेश हा त्याचे ऑटो रिक्षा क्र . एम एच ४७.एक्स. ०८०६ मधून वेश्यागमनाच्या मोबदल्यात पैसे स्वीकारून पुरुष गिऱ्हाईकांना मुली पुरवित असल्याचे निष्पन्न झाल्याने वेश्यागमनाकरीता स्वीकारलेल्या रक्कमेसह ताब्यात घेऊन ०१ पीडित महिलेची सुटका करण्यात आली. सदर बाबत पो शि . /३६६० केशव एन शिंदे यांचे फिर्यादीवरून आरोपी राजेश चौरसिया व त्याचे साथीदार पाहिजे आरोपी अरविंद रा. साकीनाका , अंधेरी पुर्व व संजय उर्फ विजय यादव रा. दहिसर पुर्व यांच्या विरुद्ध मीरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री . महेश पाटील , पोलीस उप आयुक्त (गुन्हे ) , श्री. रामचंद्र देशमुख , सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष , भाईंदर विभागाचे वपोनि. श्री. संपतराव पाटील , पोहवा . विजय ढेमरे , पोहवा. रामचंद्र पाटील , पो.शि. केशव शिंदे, मपोना ,वैष्णवी यंबर यांनी केली आहे.
