विरार : मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत आचोळे पोलीस ठाणेचे हद्दीत राहणा-या सौ. दिपीका वर्मा यांना त्यांच्या इंस्टाग्रामच्या ऍपवर अज्ञात आरोपींनी मेक मनी होम ऑनलाईन या नावाची लिंक पाठवून त्यांची वैयक्तिक व बँकेची माहिती भरण्यास सांगितली. तसेच सदर लिंकवर ऑनलाईन गेम टास्क पुर्ण करण्यास सांगितले. मात्र सौ. दिपीका वर्मा यांनी सदर माहिती भरल्यानंतर त्यांची ८८,६००/- रु. ची फसवणुक झाल्याने त्यांनी आचोळे पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान आचोळे पोलीस ठाणे यांनी सायबर गुन्हे कक्षाची तांत्रीक मदतीबाबत पत्रव्यवहार केला असता सायबर गुन्हे कक्षाने यांच्या फसवणूक झालेल्या रक्कमेबाबत पेटीएम, एस बँकेकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन कौशल्यपुर्वक तांत्रीक तपास केला व तपासामध्ये सायबर गुन्हे कक्ष यांनी आरोपी १) विक्रम रंगनाथ केदारे रा. रुम नं ४१७, जय जिवदानी, नगिनदास पाडा नालासोपारा पुर्व (तेज ट्रेडींग कंपनी च्या एस बँक खात्यात रक्कम स्विकारणारा इसम – खाते क्र. 018963300004343) २) शैलेश शांताराम कापकर वय ३० वर्षे रा. रुम नं ४०२, साई भक्ती अपार्टमेंट, दत्त नगर नालासोपारा पुर्व (खाते खोलण्यास प्रवृत्त करणारा व मदत करणारा इसम) अटक दिनांक ०१/०८/२०२२ रोजी २३.०६ वाजता ३) सतिष सुरेश पाटील, वय -३१ वर्षे, रा.रुम नं २, रामनगर, न्यु आग्रीपाडा, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई (यस बँक कर्मचारी – जाणीवपुर्वक खोटे केवायसी अपडेट केले, साईट व्हेरीफीकेशन केले नाही) यांना अटक करून पुढील कारवाई साठी आचोळे पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूकीचा प्रकार आपल्या सोबत घडलेला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्ष, www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर तक्रार द्यावी.
सदरची कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), अति.कार्य. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, सपोनि/स्वप्नील वाव्हळ, पोउपनिरी/प्रसाद शेनोळकर, पोलीस अंमलदार/प्रविण आव्हाड, गणेश इलग, महीला पोलीस अंमलदार/ माधूरी धिंडे , सुवर्णा माळी, म.सु.ब.आकाश बोरसे यांनी पार पाडली आहे.
