नंदुरबार मधून मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपींना विसरवाडी पोलिसांनी सुरत येथे ठोकल्या बेड्या.

Crime News

नंदुरबार :  दि. ८/४/२०२२ रोजी  विसरवाडी पोलीस ठाणे, नंदुरबार ,यांनी मोटार सायकलसह मोबाईल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना सुरत येथून चोरी च्या गुन्हयाखाली अटक केली आहे. सविस्तर माहितीनुसार पळसुन जि.नंदुरबार येथे राहणारे  गोविंद रामचंद्र कोकणी वय ३० हे दि.३१ ०३ २०२२ रोजी विसरवाडी गावाजवळ रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ रोडच्या लगत लघुशंकेसाठी गेले असता,त्यांच्या मालकीची काळया रंगाची शाईन मोटार सायकल व विवो कंपनीचा मोबाईल असा एकुण ३६०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात तीन चोरट्यांनी चोरुन नेला म्हणुन त्यांनी विसरवाडी पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपींन विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा उघडकीस  आणण्यासाठी श्री.पी.आर.पाटील, पोलीस अधिक्षक. नंदुरबार यांनी पोलीस पथकास आदेश केले होते .

सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन तपास सुरु असतांना दि.०६/०४/२०२२ रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सुमारे ०६ ते ०७ दिवसापुर्वी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकल व मोबाईल चोरणारे हे उधना, सुरत येथील आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन उधना सुरत येथे रवाना केले.उधना सुरत येथे गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे संशयीत आरोपींचे फक्त वर्णन होते. त्यामुळे उधना सुरत सारख्या गजबजलेल्या शहरात संशयित आरोपींचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ०२ ते ०३ दिवस सुरत उधना येथे अहोरात्र मेहनत घेवुन संशयीत आरोपींचा ठावठिकाणा शोधून आरोपी रहात असलेल्या परिसरात वेशांतर करुन सापळा रचला व दि.०८/०४/२०२२ रोजी पहाटे ०४ वाजेच्या सुमारास सदर गुन्हयातील एका संशयीत  पंकज मच्छिद्र सैंदाणे वय १९ रा. उधना, सुरत गुजरात यास त्याब्यात घेऊन  विसरंवाडी येथील मोटारसायकल व मोबाईल’ चोरी बाबत विचारपुस केली असता, त्याने पोलीसांना  उडवा उडवीची उत्तरे दिली मग पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे  इतर दोन साथीदार रियाज व दिपक यांच्या मदतीने केला असल्याची माहिती सांगितली. त्यास मोटारसायकल बाबत विचारले असता, त्याने विसरवाडी येथुन चोरी करुन आणलेली मोटारसायकल घराच्या मागील बाजुस लपवून ठेवलेली आहे व मोबाईल बंद करुन कपाटात ठेवलेला आहे.

त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल व मोबाईल हस्तगत केला.व यागुन्हात सामील असलेले आरोपी १) पठाण रियाज रज्जाक खान वय २६ रा. संजय नगर,  उधना सुरत गुजरात राज्य २) दिपक अनिलभाई जयस्वाल उप दिपक अनिलभाई हरिजन वय १८ वर्ष रा. उधना, सुरत (गुजरात राज्य) यांना ताब्यात घेतले असता त्यांनीही आपला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला आहे . ताब्यात घेण्यात आलेल्या  तीन आरोपी व गुन्हयातील चोरीस गेलेली ३१०००/- रुपये किमतीची मोटार सायकल व ५००० रुपये किमतीचा मोबाईल तसेच २००००/- रुपये किमतीची गुन्हा  करते वेळी वापरलेली स्कुटी असा एकुण ५६०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल गुन्हयाच्या पुढील तपासासाठी विसरवाडी पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आलेला असून तीनही आरोपीना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. पी.आर पाटील, प्रभारी पोलीस अधिक्षक श्री विजय पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र कळमकर,पोहेका प्रमोद गुलाबराव सोनवणे, पोना दादाभाई दामु मासुळ,पोना जितेंद्र उदयसिंग ठाकुर, पोना मोहन पांडुरंग ढमढेरे, चापोना रमेश सांळुखे, पोशि राजेंद्र चिंतामण काटके, पोशि शोएब जब्बार शेख यांचे पथकाने केली आहे. तसेच सदर गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल मा. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री विजय पवार यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.

 

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply