मीरा रोड पूर्व येथे बेव्हरली पार्क म्हाडा बिल्डिंग जवळ दिनांक रोजी रात्री काही इसम अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमी मिरारोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार मीरा रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कदम यांनी त्यांच्या पथकासह म्हाडा बिल्डिंग जवळ सापळा रचून ४ आरोपींना ताब्यात घेतले.
हे सर्व आरोपी कापड विक्री व्यापारी असून त्यांच्याकडून २,१३,५००/- रुपये किंमतीचे ३०.५ ग्रॅम कोकेन अंमली पदार्थ व २४००००/-रुपये किमतीचे २४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ असे एकूण ४,५३,५००/-रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
सदर आरोपींच्या विरुद्धात मीरा रोड पोलीस ठाण्यात गु.रजि.नं. १४/२०२१ एन.डी. पी. एस. कायदा कलम ८(क), २०(क),२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. अमित काळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, श्री विलास सानप, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम, पोलीस निरीक्षक. चव्हाण, पोलीस निरीक्षक कांबळे यांनी केली आहे.
