पालघर: “ऑपरेशन ऑल आऊट”, या अंतर्गत पालघर पोलीस दलाने मालमत्ता विरुध्द दाखल गुन्हयांतील चोरीस गेले ४ मोटार सायकल जप्त, २५४ वाहन धारकांवर गुन्हे दाखल, २३ पाहीजे असलेले आरोपी यांना अटक , दारुबंदी कायद्याप्रमाणे ३० गुन्हे दाखल, १२५ निगराणी बदमाशांची एकाच वेळी तपासणी.असे अभियान याबविण्यात आले .
मिळालेल्या माहिती नुसार जिल्हा पोलीस अधीक्षक पालघर श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. प्रकाश गायकवाड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह ३३२ पोलीस अंमलदारांच्या सक्रीय सहभागातुन दिनांक २७/०७/२०२२ रोजी “ऑपरेशन ऑल आऊट” राबविले. सदर अभियानाचा मुख्य उद्देश हा सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अमंलदार हे वरीष्ठ अधिका-याच्या नेतृत्वाखाली सर्व समावेशक व आक्रमक कारवाई करुन गुन्हेगारावर विविध कायद्यातंर्गत परीणामकारक कारवाई करतील. जिल्हयातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक पालघर श्री. बाळासाहेब पाटील यांनी सदरचे अभियान राबविण्याचे निश्चित केले व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सविस्तर सुचना दिल्या. सदरचे अभियान हे दिनाक २७/०७/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरु होऊन रात्री २२.०० वाजता संपले. हे अभियान एकुण महत्वाच्या ३ टप्यामध्ये पार पाडण्यात आले. j) नाकाबंदी ii) कारवाई पथक iii) कोम्बिंग ऑपरेशन- गुन्हेगार लपण्याच्या वस्त्यामध्ये मोठया संख्येने मनुष्यबळाने जाऊन संपुर्ण क्षेत्र पिंजून काढणे व गुन्हेगारांचा शोध घेणे.
सदरचे अभियान पालघर जिल्हयामध्ये अत्यंत प्रभाविपणे राबविण्यात आले. या अभियाना दरम्यान गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी व सर्वसामान्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाने १६ पोलीस ठाणे हद्दीमध्ये ३४ महत्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी लावली होती. तसेच पहाटेच्या वेळी गुन्हेगारांच्या आश्रयस्थान असलेल्या एकुण २३ वस्त्यामध्ये एकाचवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
सदरचे ऑपरेशन हे श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर व श्री. प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.
