भाईंदर – सिंगरच्या नावाखाली देहव्यापार करुन घेणारी महिला ताब्यात घेवुन एका पिडित मुलीची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकास यश.अधिक माहीतीनुसार दि.२६/०२/२०२४ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांना बातमीदारकडून माहीती प्राप्त झाली की, वेश्यादलाल महिला रोशनी शेख, रा. सांताक्रुझ मुंबई, हि सिंगर असुन तिच्या संपर्कात हिंदी कवाली मध्ये काम करणाऱ्या मुली असुन त्यांना गिऱ्हाईकाने फोनद्वारे संपर्क साधला की, ती गिऱ्हाईकास मुंबई सांताक्रुझ, अंधेरी, दहिसर, बोरीवली, काशिमीरा या परिसरातील लॉजमध्ये रुम बुक करावयास लावुन किंवा गिऱ्हाईकाचे सोयीनुसार हिंदी कवाली मध्ये काम करणाऱ्या मुलींना शॉर्ट टाईमसाठी एका मुलीचा वेश्यागमनाचा मोबदला व तीचे कमीशन असे एकुण २०,००० / – रु घेवुन पुरुष गिऱ्हाईकास वेश्यागमनासाठी मुली पुरविते.
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने कायदेशीर बाबींची पुर्तता करुन बोगस गिऱ्हाईक तयार करुन वेश्यादलाल रोशनी शेख हिच्याशी संपर्क करुन तिने सांगितल्याप्रमाणे दारास ढाबा, मुंबई अहमदाबाद हायवे रोड, काशिमीरा या ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळुन १७.१० वा. छापा टाकला असता, महिला वेश्यादलाल आरोपी १) रोशनी बबलु शेख, वय- ४० वर्ष हिने एका पिडित मुलीस सोबत आणुन वेश्यागमनासाठी प्रवृत्त करुन वेश्यागमनाच्या बोलीवर रक्कम ठरवुन स्वत:च्या उपजिवीकेकरीता रक्कम स्वतः स्विकारल्याने तीला व सापळयातील रोख रक्कम तसेच इतर मुद्देमालासह ताब्यात घेवुन एका पिडीत मुलीची सुटका करण्यात आली. ताब्यातील घेतलेली वेश्यादलाल रोशनी बबलु शेख, वय-४० वर्ष हिच्या विरुध्द सफौ / उमेश पाटील यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने काशिमिरा पोलीस ठाणे दिनांक २७/०२/२०२४ रोजी गुन्हा नोंद दाखल आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि. भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. समीर अहिरराव, स. पो.उप.निरी. उमेश पाटील, पो. हवा. शिवाजी पाटील, पो. अं. केशव शिंदे, चेतनसिंग राजपुत, चा. पो. हवा. सम्राट गावडे, म.पो.अं. शितल जाधव सर्व नेम. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष- भाईंदर व म.पो. अं. पुजा हंडे नेम – भरोसा सेल यांनी केली आहे.
