पालघर येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहेश शैटये याना दिनांक- ३/०४/२०२१ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी वरून सकाळी ०६-०० ते १४-३० वाजताच्या दरम्यान अर्नाळा किल्ला ता.वसई जि.पालघर येथे हातभट्टी दारू बनविणारे इसमावर अचानक छापा मारून हातभट्टी दारू बनविण्याचा चॉश,गावठी दारू काळा गुळ असा एकुण ३,१८,५००/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
आरोपी विरुद्ध एकुण सहा गुन्हे नोंद करण्यात आले.
१) १००/२०२१ मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५ फ) प्रमाणे दि.०३/०४/२०२१ रोजी १९.२७
आरोपीत दमयंती नरहरी भोईर रा- म्हाजेवाडी अर्नाळा किल्ला ता-वसई,
२) १०१/२०२१ मुंबई दारुबंदी कायदा कलम ६फ) प्रमाणे दि. ०३/०४/२०२१ रोजी १९.४०
रोजी आरोपीत अशोक मेहेर रा. म्हाजेवाडी अर्नाळा किल्ला ता-वसई, जि-पालघर
३) १०२/२०२१ मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५फ) प्रमाणे दि. ०३/०४/२०२१ रोजी
१९.-४६ रोजी आरोपीत विजय रमेश म्हाजे रा. म्हाजेवाडी अर्नाळा किल्ला
ता-वसई,
४) १०३/२०२१ मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५फ) प्रमाणे दि. ०३/०४/२०२१ रोजी १९.५४
रोजी आरोपीत एकनाथ वैती यांचा मुलगा नांव माहित नाही घर नं.१५१
म्हाजेवाडी अर्नाळा किल्ला ता.वसई
५) १०४/२०२१ मुंबई दारुबंदी कायदा कलम ६-फ) प्रमाणे दि. ०३/०४/२०२१ रोजी
२०.०४ रोजी आरोपीत प्रभाकर तुळशीदास धनु वय.४८ रा.अर्नाळा किल्ला
ता-वसई,
६) १०५/२०२१ मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५फ) प्रमाणे दि.०३/०४/२०२१ रोजी २०.१०
रोजी आरोपीत रमेश म्हात्रे रा. म्हाजेवाडी अर्नाळा किल्ला ता-वसई,
सदर कारवाई श्री संजयकुमार पाटील सो पोलीस उप आयुक्त,परीमंडळ-२ मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली, श्री चंद्रकांत जाधव सहा.पोलीस आयुक्त नालासोपारा विभाग, तसेच महेश शेटये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमरसिंह पाटील, पोलीस निरीक्षक, पो.उपनिरी/चांगदेव कोळेकर व पथक यांनी केली आहे.
