विरार (दि. ०७) : विरारमध्ये व्यापाऱ्यावर ऍसिड हल्ला करणा-या आरोपीस अटक गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांची कामगिरी.अधिक माहितीनुसार दिनांक ०८/०७/२०२३ रोजी विरार पुर्वेकडील एल.ई.डी. लाईटचे व्यापारी श्री. मोबीन असमत शेख, वय ४२ वर्षे, रा- गोपचरपाडा विरार पुर्व हे रात्रौ ०८.३० वा. च्या सुमारास त्यांच्या ऍक्टिव्हा गाडीवरुन मकवाना कॉम्पलेक्स परिसरात बाजारात जात असताना अनोळखी दोन इसमांनी त्यांच्या जवळील ॲसिड या अत्यंत दाहक व ज्वलनशील पदार्थाने भरलेली प्लास्टीक पिशवी मोबीन शेख यांच्या पाठीमागील बाजुस फेकल्याने शेख यांच्या मानेला दुखापत झाल्याबाबत फिर्याद दिल्याने दोन अनोळखी इसमां विरुध्द विरार पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष- ३, विरारचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीदाराकरवी प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी १) मस्तान उस्मान शेख, अलसिफा व्हाईट हाऊस, गोपचर पाडा, विरार पुर्व, ता. वसई, जि. पालघर, २) संकेत परमेश्वर शर्मा, रा. बापु सी अपार्टमेंट, रामु कंम्पाऊन्ड विरार पुर्व, ता. वसई, जि. पालघर, जयेश राकेश तरे, रुम नंबर ०२, गगनगिरी अपार्टमेंट, रामु कंम्पाऊन्ड विरार पुर्व, ता .वसई, जि. पालघर यांना दिनांक १०/०७/२०२३ रोजी ताब्यात घेवुन तपास केला असता आरोपी क्रमांक ०१ याने त्याच्या वैवाहीक वादाच्या कारणावरुन आरोपी क्रमांक २ व ३ यांना ४,००,०००/- ( चार लाख ) रुपयांची सुपारी देवून त्यांच्या करवी फिर्याद देणार यांचेवर ऍसिड हल्ला केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी क्रमांक ०१ मस्तान उस्मान शेख यांचा पोलिसांनी पुर्वइतिहास पडताळुन पाहता त्याच्या विरुध्द यापुर्वी देखील विरार पोलीस ठाणे येथे मारामारी व सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत गुन्हे दाखल आहेत.
सदर ऍसिड हल्ला प्रकरणी अनोळखी आरोपी याच्या बाबत कोणताही सुगावा नसताना गुन्हें शाखा कक्ष ३, विरारच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने कसोशीने तपास करुन ४८ तासांच्या आत नमुद गुन्हयातील मुख्य सुत्रधार व त्याचे दाने साथीदार यांना ताब्यात घेण्यात यश मिळविले असुन आरोपी यांना पुढील कारवाई करीता विरार पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-३, विरारचे पो.नि. प्रमोद बडाख, पो.उप.निरी. शिवाजी खाडे, उमेश भागवत, अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, पो. अंम. राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, म.सु. ब. प्रविण वानखेडे तसेच स .फौ. संतोष चव्हाण नेम सायबर सेल केलीआहे.
